Watermelon Viral Video : तापमान वाढायला लागलं की, लोक शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी लालेलाल, रसाळ आणि गोड अशा कलिंगडावर ताव मारतात. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच कलिंगड खाणं आवडतं. काही लोक कलिंगडाचा ज्यूसही पितात. कलिंगडामध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी असतं. त्यामुळे हे फळ उन्हाळ्यात शरीरासाठी खूप फायदेशीर मानलं जातं.
वेगवेगळ्या ऋतुंमध्ये वेगवेगळी फळं खाण्याचा सल्ला डाएट एक्सपर्ट आणि डॉक्टर देत असतात. कारण त्या त्या दिवसांमध्ये शरीराला या फळांमधून आवश्यक ते पोषण मिळत असतं. मात्र, आजकाल बाजारात अनेक फेक किंवा केमिकल्स वापरलेल्या गोष्टी मिळत आहेत. यातून फळंही सुटलेली नाहीत. कलिंगडाचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर कलिंगड घेताना तुम्हीही आधी विचार कराल.
सामान्यपणे तुम्ही पाहिलं असेल की, कलिंगडाची डार्क हिरव्या रंगाची साल कधीच वेगळी काढता येत नाही. पण या व्हिडिओत दाखवण्यात आलं आहे की, कलिंगडाची ही साल सहजपणे कव्हर काढल्यासारखी निघत आहे. त्यामुळे व्हिडिओत असा संशय व्यक्त करण्यात आला आहे की, कलिंगड प्लॅस्टिकपासून तर बनवण्यात आलं नसेल ना...
त्यामुळे तुम्हीही कलिंगड घ्यायला जाल तेव्हा आधी ते व्यवस्थित चेक करा. त्यावर केमिकल्स किंवा अजूनही कशाचा वापर तर केला नाही हेही चेक करा. जर अशाप्रकारचे फेक फळं खाल्ली तर तुमचं आरोग्य बिघडू शकतं आणि तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावं लागू शकतं.
लोकांना सतर्क करणारा हा व्हिडीओ @punepulse या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ३४ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले असून लोकांनी शेअरही केला आहे. तर कमेंट करत अनेक यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.