लांब पल्ल्याचा प्रवास करताना आपण ट्रेन, बस, विमान किंवा विविध प्रकारच्या वाहनांमधून प्रवास करून अंतिम स्थळ गाठतो. यादरम्यान आपली भेट अनोळखी व्यक्तींशी होते (Railway Protection Force). ज्यामुळे प्रवास अधिक सुखकर होतो. पण ट्रेनच्या प्रवासात कधी कधी अशा प्रकारची माणसं भेटतात, ज्यामुळे आपल्याला मनस्ताप सहन करावा लागतो; आणि अशाच प्रकारचा मनस्ताप एका मुलीला सहन करावा लागला आहे (Social Viral).
एका कुटुंबीयांनी तिची एक्स्प्रेसमधील सीट तर बळकावली, शिवाय तिच्यावर आरडाओरडाही केला. ही घटना नक्की कुठे घडली? नेमकं प्रकरण काय? यावर रेल्वे प्रशासनाने काय मदत केली? पाहूयात(Family occupies a passenger’s seat on a train, RPF steps in to help).
नेमकं घडलं काय?
१८ फेब्रुवारी रोजी YNRK-HWH एक्स्प्रेसने एक महिला प्रवास करत होती. संबंधित महिला प्रवाशाकडे सीटची रिझर्व्ह तिकीट होती. मात्र काही प्रवाशांनी तिची सीट अडवली आणि तिथून उठण्यास नकार दिला. तिने घडलेला सगळा प्रकार आपल्या भावाला सांगितला. त्यानंतर त्याने ट्विटरवर पोस्ट शेअर करीत रेल्वे प्रशासनाकडे मदत मागितली.
'बस एक दुलहन चाहिए' वधूच्या शोधात निघाला पठ्ठ्या; ई-रिक्षाच्यामागे चिटकवला लग्नाचा बायोडेटा
भावाच्या ट्विटची घेतली रेल्वे प्रशासनाने दखल
For the first time my younger sister is travelling alone by train.
— Potato!🚩 (@Avoid_potato) February 18, 2024
Anyhow we got our ticket confirmed at the last moment and train arrived 3hrs late.
She went to her seat and it was not vacant, an uncle ji with her whole family was sitting there. pic.twitter.com/ECEbllMKXp
पोस्ट शेअर करत आपल्या बहिणीची कहाणी सांगताना युजर म्हणाला, 'माझी धाकटी बहिण पहिल्यांदाच ट्रेनमधून एकटी प्रवास करीत आहे. आमचे तिकीट शेवटच्या क्षणी कन्फर्म झाले. ट्रेन तीन तास उशिरा पोहोचली. ती आपल्या सीटजवळ पोहोचताच, तिच्या आधी सीटवर एक काका त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह बसले होते. बहिणीने त्यांना तिथून उठायला सांगितल्यावर काका ओरडायला लागले.'
पडत्या काळात विक्रांतला सावरलं, फिल्म ऑडिशन्सला जाण्यासाठी पैसे नसायचे, शीतलने केली मदत..
युजर पुढे म्हणतो, 'माझ्या बहिणीला प्रॅक्टिकल परीक्षेला जायचे होते, आणि त्यात तिची तब्येत बरी नाही. पण, त्या काकांनी तिला इतर तीन प्रवाशांसह वरच्या बर्थवर बसायला सांगितले. माझ्या बहिणीकडे कन्फर्म तिकीट असूनही ट्रेनमध्ये तिला बसायला जागा मिळाली नाही. पण लाही लोकं विनातिकिटाचे दमदाटी करून सीट बळकावतात.'
हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होताच, भारतीय रेल्वेने तात्काळ त्या तरुणीला मदत केली आणि २० मिनिटांनंतर तिला तिची सीट मिळवून दिली.