Lokmat Sakhi >Social Viral > ना सब्यसाची, ना मनीष मल्होत्रा; तब्बल २ हजार तासात पोरीनं स्वत: बनवला आपल्या लग्नाचा ड्रेस; काय आहे खासियत

ना सब्यसाची, ना मनीष मल्होत्रा; तब्बल २ हजार तासात पोरीनं स्वत: बनवला आपल्या लग्नाचा ड्रेस; काय आहे खासियत

Floral Lehenga : तिच्या मेहंदी समारंभात सर्वात सुंदर दिसण्यासाठी, मुलीने स्वतः लेहेंगा डिझाइन केला इतकंच नाही तर तिच्या रंगीत डिझाइनने सब्यसाची आणि मनीष मल्होत्रा ​​सारख्या प्रसिद्ध डिझायनर्सनाही थक्क केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 09:08 AM2022-07-09T09:08:12+5:302022-07-09T09:15:39+5:30

Floral Lehenga : तिच्या मेहंदी समारंभात सर्वात सुंदर दिसण्यासाठी, मुलीने स्वतः लेहेंगा डिझाइन केला इतकंच नाही तर तिच्या रंगीत डिझाइनने सब्यसाची आणि मनीष मल्होत्रा ​​सारख्या प्रसिद्ध डिझायनर्सनाही थक्क केले.

Fashion designer akanksha gajria wore a 3d floral lehenga for her mehendi ceremony which took 2000 jobs hours | ना सब्यसाची, ना मनीष मल्होत्रा; तब्बल २ हजार तासात पोरीनं स्वत: बनवला आपल्या लग्नाचा ड्रेस; काय आहे खासियत

ना सब्यसाची, ना मनीष मल्होत्रा; तब्बल २ हजार तासात पोरीनं स्वत: बनवला आपल्या लग्नाचा ड्रेस; काय आहे खासियत

भारतीय संस्कृती विविधतेने भरलेली आहे. येथील प्रत्येक धर्म, जात, पंथाची स्वतःची परंपरा आहे.  जेव्हा लग्नाचा प्रश्न येतो तेव्हा या दरम्यान देखील अनेक सुंदर विधी केले जातात. लग्नात केल्या जाणार्‍या सर्व विधींमध्ये, मेहंदी समारंभ देखील असतो, जो लग्नाच्या एक किंवा दोन दिवस आधी पूर्ण होतो. या विधीमध्ये केवळ वधूलाच मेहंदी लावली जात नाही तर यावेळी ती आपल्या अनोख्या पोशाखाने लोकांची मने जिंकण्याची एकही संधी सोडत नाही. (Fashion designer akanksha gajria wore a 3d floral lehenga for her mehendi ceremony which took 2000 jobs hours)

मुंबईच्या या नववधूने तिच्या लग्नातही असेच काहीसे केले. तिच्या मेहंदी समारंभात सर्वात सुंदर दिसण्यासाठी, मुलीने   स्वतः लेहेंगा डिझाइन केला इतकंच नाही तर तिच्या रंगीत डिझाइनने सब्यसाची आणि मनीष मल्होत्रा ​​सारख्या प्रसिद्ध डिझायनर्सनाही थक्क केले.

मुंबईस्थित फॅशन डिझायनर आकांक्षा गजरिया, जिने तिच्या मेहंदी कार्यक्रमात उठून दिसण्यात कोणतीही कसर सोडली नाही. तिच्या मेहंदी समारंभासाठी आकांक्षाने कस्टम मेड फ्लोरल 3D लेहेंगा तयार केला होता, ज्यामध्ये तिची सुंदरता नजरेत भरली होती. हा एक प्रकारचा दोन तुकड्यांचा पोशाख होता, जो तिने  रंगेबिरंगी-कॉन्ट्रास्ट फुलांनी सजवला होता. या सेटमध्ये क्रॉप-लांबीची चोली दाखवण्यात आली होती, ज्याचा घागरा खूप मोठा होता. पोशाखाचा पॅटर्न पूर्णपणे सुशोभित केलेला होता, ज्यामुळे चांगले कॉम्बिनेशन दिसून आले. 

घरातली पाण्याची टाकी स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक; प्लबंरला न बोलावताही टाकी होईल झटपट स्वच्छ

तिच्या आउटफिटबद्दल बोलताना आकांक्षाने लिहिले, ''मला माझ्या मेहंदीसाठी असे काहीतरी घालायचे होते जे खूप छान रंगीबेरंगी आणि क्लासिक दिसेल. म्हणूनच मी हा पोशाख निवडला. हा पोशाख बनवण्यासाठी, मी माझ्या दुकानातून उरलेले सर्व फॅब्रिक गोळा केले आणि बॉर्डरला टाय-डाय करताना त्यावर 3D फुलांचे नक्षीकाम केले. प्रथम मी फॅब्रिकवर हाताने भरतकाम केले आणि मग एक एक करून कट फ्लॉवरचे आकृतिबंध लावले.''

 

तिच्या म्हणण्यानुसार हा लेहेंगा बनवण्यासाठी  2000 तासांपेक्षा जास्त वेळ लागला. आकांक्षाने या पोशाखासोबत मोती-पोल्की, पन्ना आणि रुबी चोकरचा सेट परिधान केला होता, ड्रेसला साजेसे कानातले घातले होते. त्याच वेळी, तिने कमीतकमी मेकअप आणि सॉफ्ट कर्ल्ड ट्रेसेससह तिचा वधू लूक अधिक खुलवला.

Web Title: Fashion designer akanksha gajria wore a 3d floral lehenga for her mehendi ceremony which took 2000 jobs hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.