लसणाचा वापर स्वंयपाकाची चव वाढवण्यासाठी केला जातो. लसूण फक्त स्वयंपाकाची चव वाढवत नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो. (Cooking Hacks) अनेक महिला जेवणात लसूण घालणं टाळतात कारण लसूण सोलणं हे त्यांना खूपच किचकट काम वाटतं. (5 Hacks For Removing Garlic Skin)लसूण सोलल्यानंतर नखांना त्रास होते इतकंच नाही तर हातांचा वासही येतो. ५ मिनिटात लसूण सोलण्यासाठी तुम्ही काही सोपे हॅक्स ट्राय करू शकता. (The Best Ways To Peel Garlic Within 20 Secs)
1) लाटण्याचा वापर करू शकता
जर तुम्हाला लसूण सोलण्याचं काम खूपच अवघड वाटत असेलल तर तुम्ही लाटण्याचा वापर करू शकता. लाटण्याच्या साहाय्याने लसूण सोलणं खूपच सोपं काम आहे. या उपायाने लसूण लहज सोलून होईल. लसूण एकदम साफ झालेला दिसून येईल.
2) गरम पाण्याचा वापर करा
तुम्ही लसूण सोलण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू शकता. हा उपाय करण्यासाठी एका बाऊलमध्ये गरम पाणी घाला. त्यात लसणाच्या पाकळ्या घालून ३ मिनिटं तसंच ठेवून द्या. त्यानतंर काहीवेळासाठी हा बाऊल ओव्हनमध्ये ठेवून द्या. नंतर हलक्या हाताने रगडून सालं काढून घ्या. हा उपाय केल्यास लसणाचा वास हातांना येणार नाही.
3) सुरीचा वापर करा
लसूण सोलण्यासाठी तुम्ही सुरीचा वापर करू शकता. लसूण सोलण्यासाठी टोकदार सुरीचा वापर करा. लसणाच्या कळ्यांचा पुढचा भाग व्यवस्थित सोलून सालं काढून घ्या. याव्यतिरिक्त लसणाची सालं काढून टाकण्यासाठी तुम्ही दगडाचा वापरही करू शकता. यासाठी लसूण थोडा कुस्ककरून घ्या त्यानंतर सालं काढा. लसूण सोलण्यासाठी एका लांबट भांड्यात लसूण घेऊन शेक करून सोलून घ्या. जर लसूण सोलल्यानंतरही हातांमध्ये वास येत असेल तर तुम्ही एप्पल सायडर व्हिनेगर, नारळाच्या तेलाचा वापर करू शकता.
शरीराला कॅल्शियम हवंय पण दूध नको वाटतं? ५ पदार्थ रोज खा, पोलादी शरीर-मजबूत होतील हाडं
4) थंड पाणी
लसणाची सालं काढून टाकण्यासाठी तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. यासाठी सगळ्यात आधी लसूण काही तासांसाठी पाण्यात भिजवून ठेवून द्या. जवळपास 1 तासानंतर लसूण पाण्यातून बाहेर काढा आणि जमिनीवर ठेवून दाबा. असं केल्याने लसणाची सालं निघून जातील.
5) मायक्रोव्हेव
लसूण सोलण्यासाठी तुम्ही मायक्रोव्हेव्हचा वापर करू शकता. यासाठी लसूण 20 ते 30 सेकंदासाठी मायक्रोव्हेव्हमध्ये ठेवून गरम करा. जेव्हा लसूण गरम होतील तेव्हा सालं सहज निघतील.