Join us  

१० रुपयांच्या प्लास्टिक बॉटलने सोला किलोभर लसूण, लसूण सोलण्याचं किचकट काम होईल सोपं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2023 2:26 PM

Fastest Way To Peel Garlic : तासंतास लसूण सोलत बसू नका, एक युनिक ट्रिक करा आणि झटकन काम तमाम करा

भारतीय स्वयंपाकात लसणाचा (Garlic) वापर होतोच. डाळीला फोडणी असो, किंवा भाजीमध्ये मसाला तयार करण्यासाठी याचा वापर हमखास होतोच. लसणाचा स्वाद आणि सुगंध यामुळे पदार्थाची चव दुपट्टीने वाढते. मात्र लसूण पाकळ्या सोलण्यासाठी खूप वेळ जातो आणि कंटाळाही येतो. शिवाय अनेकदा हात जळजळतात.

लसूण खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यामुळे बरेच गंभीर आजार दूर होतात. त्यामुळे स्वयंपाकात लसूण हवाच. पण लसूण सोलताना कंटाळा येतो, किंवा या वेळखाऊ कामाकामुळे इतर कामे रखडली जातात (Kitchen Tips). जर आपल्याला झटपट लसूण सोलायचा असेल तर, १० रुपयांची प्लास्टिक बॉटल घ्या, आणि हात न लावता लसूण झटपट सोला(Fastest Way To Peel Garlic).

प्लास्टिक बॉटलने लसूण सोलण्याची युनिक ट्रिक

सर्वप्रथम, प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ४ ते ५ लसणाचे गड्डे ठेवा. ही प्लास्टिकची पिशवी एका प्लेटवर ठेवा. नंतर अर्धवट पाण्याने भरलेली प्लास्टिकची बॉटल घ्या, व याने लसणावर हलका मार देत राहा. जर आपल्याकडे प्लास्टिकची बॉटल नसेल तर, आपण लाटण्याचा वापर देखील करू शकता. यामुळे पाकळ्या वेगळ्या होतील, शिवाय सालही निघून जाईल.

गॅस सिलेंडरच्या पाईपलाही असते एक्सपायरी डेट, आत्ताच घरातील पाईप चेक करा, अन्यथा घडेल दुर्घटना, वेळीच काळजी घ्या..

दुसरी ट्रिक

पोळपाट लाटणे तुम्ही खरेच एकदम स्वच्छ करता का? पाहा योग्य पद्धत, नाहीतर होते इन्फेक्शन

एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी कोमट झाल्यानंतर त्यात लसणीच्या सर्व पाकळ्या घालून ठेवा. १० मिनिटानंतर पाकळ्या काढा आणि हातावर रगडा. यामुळे काही मिनिटात लसणीच्या पाकळ्यांची सालं निघून येतील. शिवाय वेळेची बचतही होईल.

टॅग्स :किचन टिप्ससोशल व्हायरलसोशल मीडियाकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.