बाप लेकीचं नातं सगळ्यात निराळं असतं. असं म्हणतात की लेकीचा आईपेक्षा वडिलांवर जास्त जीव असतो. घरात कितीही माणसं असली तरी वडिलांची सगळ्यात जास्त काळजी ही लेकीलाच असते अनेक लहान सहान गोष्टींवर हे दिसून येतं. औषध वेळेवर घेतील ना, कामावरून यायला उशीर का होतोय अशा खूप गोष्टी वडीलांच्या काळजीनं मुलींच्या डोक्यात सुरू असतात. (Father breaks down after daughter places her coat over him while he was asleep watch video)
आता व्हायरल झालेला व्हिडिओ इंस्टाग्रामवर लोकांनी शेअर केला आहे. किचनच्या काउंटरवर एक माणूस झोपलेला दिसत आहे. किचनमध्ये काम करताना वांग नावाचा माणूस झोपी गेला. त्याच्या लहान मुलीने ते पाहिलं आणि तिच्या वडिलांना थंडी वाजू नये म्हणून तिनं त्यांच्या अंगावर पांघरूण घातलं.
आपल्या मुलीने आपल्यासाठी काय केले हे लक्षात आल्यानंतर वांग यांना भरून आलं. 'सो स्वीट' असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे. नेटिझन्स लहान मुलीच्या हावभावाने प्रभावित झाले आणि त्यांनी कमेंट्स विभागात प्रेमाचा वर्षाव केला. "एक मजबूत कुटुंब एकमेकांची काळजी घेते," अशी कमेंट एका युजरने केली आहे.