'पापा की परी', पापा की लाडली, अशा अनेक नावांवरून मुलीला बोलवण्यात येते. कारण बाप - लेकीचे नाते हे तितकेच खास, प्रेमळ आणि हटके असते. मुलीसाठी तिचा बाप सर्वस असतो. बाबांचा हात पकडत मुली कधी मोठी होतात हे कळून देखील येत नाही. बापाची एक कृती लेकीला खूप मोठा आनंद देऊन जाते.
सध्या अशाच एका बापाची जोरदार चर्चा सोशल मिडीयावर होत आहे. व्हायरल होण्यामागचं कारण ही तसेच काहीसं खास आहे. एका वडिलांनी आपल्या लेकीला मासिक पाळी आली म्हणून पार्टीचे आयोजन करून साजरी केली आहे. सध्या या कार्यक्रमाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत असून, त्या वडिलांचे देखील कौतुक होत आहे(Father celebrates daughter's first period in Uttarakhand).
काशीपूरचे रहिवासी जितेंद्र भट्ट व त्यांची पत्नी भावना सती यांना १३ वर्षांची रागिणी नावाची मुलगी आहे. रागिणीला पहिल्यांदाच मासिक पाळी आली आहे. मासिक पाळी पहिल्यांदा आल्यावर प्रत्येक मुलगी अस्वस्थ होते. रागिणी देखील थोडीशी अस्वस्थ होती. यावेळी पालकांनी तिच्याशी संवाद साधून मासिक पाळी म्हणजे काय? आणि मासिक पाळी तिच्यासाठी का खास आहे हे समजावून सांगितलं.
कपड्यांवर पडलेले गंजाचे डाग निघता - निघत नाही? ४ भन्नाट टिप्स, डाग होतील गायब
जितेंद्र यांनी सोशल मीडियावर काही छायाचित्रांसह एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये जितेंद्र भट्ट यांनी लिहिले की, ''मुलगी मोठी झाली आहे. रागिणीला मासिक पाळी सुरू झाल्यामुळे आनंदी आहे. आज मोठा सण आहे, रागिणीला शुभेच्छा." हा कार्यक्रम त्यांनी केक कापून साजरा केला असून, रागीणीच्या मित्रांनी आणि परिवाराने या कार्यक्रमात हजेरी लावली होती.
जेवलीस का? J1 झाले का विचारणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी दिला रट्टा, पोस्ट व्हायरल
उत्तर भारतात पीरियड्सबाबत अनेक गैरसमज आहेत, पण उत्तराखंडच्या काशीपूरमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाने आपल्या मुलीची पहिली पाळी आनंदात साजरी केली आहे, त्यामुळे या कुटुंबियांची सर्वत्र चर्चा होत असून, वडिलांचे देखील कौतुक होत आहे.