सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हालाही या वडील मुलीचा हेवा वाटेल. या व्हिडिओत वडील मुलीचे मायेनं केस विंचरत आहेत. (Viral Video) ट्विटरवर हा व्हिडिओ फिगन नावच्या युजरनं शेअर केला असून या व्हिडिओला ५ लाखांपेक्षा जास्त व्हिव्हज मिळाले आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये वडील लेकीला शाळेत जाण्यासाठी तयारी करण्यास मदत करत आहेत. (Father Combs his daughters hair every morning in wholesome viral video)
This Dad combs his daughter's hair every morning. 💞 pic.twitter.com/7OxnD5nOsK
— Figen (@TheFigen_) November 8, 2022
व्हिडिओमध्ये आधी व्यवस्थित केस विंचरून ते त्या केसांची हेअरस्टाईल करत आहेत. यासाठी त्यांनी क्लिप्सचा वापर केल्याचं दिसून येईल. या व्हिडिओमध्ये मुलीचे केस विंचरून ते तिला हवीतशी हेअरस्टाईल करत आहेत. तिला कोणत्या प्रकारची हेअरस्टाईल आवडते हेसुद्धा त्यांनी विचारलं आहे.
'मी सिंगलच बरा आहे..' गर्लफ्रेंडबरोबर बाईक राईड भावाला चांगलीच महागात पडली, पाहा व्हिडिओ
बापलेकीच्या नात्यातील हे प्रेम नेटिझन्सना खूप आवडलं आहे. एक युजरनं कमेंट केली आहे की, 'त्यांना या प्रयत्नांसाठी ए ग्रेड द्यायला हवा आणि वडिलासोबतचा हा वेळ कधीच विसरता येणार नाही.' असंही एकानं म्हटलंय. 'त्याच्यातील नातं खूप घट्ट आहे. माझ्या मुलीचाही अशाच पद्धतीनं मी ब्रश करून देते.' अशी कमेंट एका महिलेन केली आहे. 31 हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडिओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.