Lokmat Sakhi >Social Viral > बाप म्हणावे की काय.. ३ वर्षांच्या मुलीला शिक्षा, टीव्ही पहायचा तर रडून अश्रूंनी वाटी भर

बाप म्हणावे की काय.. ३ वर्षांच्या मुलीला शिक्षा, टीव्ही पहायचा तर रडून अश्रूंनी वाटी भर

Father makes 3-year-old daughter fill bowl with tears for watching excess television : वडिलांनी मुलीला दिली अजब शिक्षा म्हणाले, रडून वाटी भर मगच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2024 05:39 PM2024-07-10T17:39:28+5:302024-07-10T17:40:39+5:30

Father makes 3-year-old daughter fill bowl with tears for watching excess television : वडिलांनी मुलीला दिली अजब शिक्षा म्हणाले, रडून वाटी भर मगच..

Father makes 3-year-old daughter fill bowl with tears for watching excess television | बाप म्हणावे की काय.. ३ वर्षांच्या मुलीला शिक्षा, टीव्ही पहायचा तर रडून अश्रूंनी वाटी भर

बाप म्हणावे की काय.. ३ वर्षांच्या मुलीला शिक्षा, टीव्ही पहायचा तर रडून अश्रूंनी वाटी भर

आजकाल लहान मुलांसाठी टीव्ही पाहणे किंवा मोबाईल फोन वापरणे सामान्य झाले आहे (Social Viral). अनेक मुलं याशिवाय अन्नही खात नाहीत. अशा स्थितीत पालकांना मुलांचे ऐकून घ्यावे लागते. त्यांचा हट्टीपणा पूर्ण करावाच लागतो. हट्टीपणा पूर्ण न केल्यास मुलं अततायीपणा करतात. काहीच ऐकत नाही, रुसून बसतात. अशावेळी काही पालक मुलांवर चिडतात.

मुलांची ही सवयी मोडण्यासाठी पालक अनेक युक्ती लढवतात. अशाच एका वडिलांनी मुलीची टीव्ही पाहण्याची सवयी सुटावी म्हणून एक शक्कल लढवली आहे. ही पद्धत जाणून घेतल्यावर काहींनी वडिलांना ट्रोल केलं तर, काहींनी समर्थन दर्शवलं. वडिलांनी मुलीला नक्की कोणती शिक्षा दिली?(Father makes 3-year-old daughter fill bowl with tears for watching excess television).

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, दक्षिण चीनच्या गुआंग्शी झुआंगच्या युलिनस्थित एका व्यक्तीने मुलीची टीव्ही पाहण्याची सवय सुटावी म्हणून एक शक्कल लढवली आहे. झालं असं तर, वडील रात्रीच्या जेवणाची तयारी करत होते. यानंतर त्यांनी आपल्या मुलीला जेवणाच्या टेबलावर येण्यास सांगितले, परंतु मुलगी टीव्ही पाहण्यात इतकी मग्न होती की तिने वडिलांचे ऐकले नाही. पुढे वडिलांना राग आला, त्यांनी टीव्ही बंद केला. त्यानंतर मुलगी ढसाढसा रडू लागली.

नितीन गडकरींना आवडते टोमॅटोची झणझणीत चटणी; वाफेवर शिजवा - कमी तेलात ५ मिनिटात तयार

जोपर्यंत वाटी भरत नाही तोपर्यंत रडायचं..

रिपोर्ट्सनुसार, मुलीला रडताना पाहून वडिलांनी स्वयंपाकघरातून एक रिकामी वाटी आणली, आणि तिच्या हातात दिली. नंतर वडिलांनी तिला सांगितलं की, 'जेव्हा ही वाटी तुझ्या अश्रूंनी भरेल, तेव्हाच तू पुन्हा टीव्ही पाहू शकशील'. सध्या याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडिओ तिच्या आईने रेकॉर्ड करून पोस्ट केला आहे.

दात नीट घासले तरी दातांवर पिवळा थर येतो? घरच्याघरी खास टूथपावडर, अमेरिकन तज्ज्ञ सांगतात उपाय

या व्हिडिओमध्ये तिचे अश्रू गोळा करण्यासाठी मुलगी वाटी चेहऱ्याखाली घेते, आणि शक्य तितके अश्रू काढण्याचा प्रयत्न करते. मात्र, नंतर वाटी धरून तिचे हात दुखू लागतात. 'माझ्यासाठी हे करणं अशक्य आहे.' असं ती वडिलांना म्हणते. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी तिला हसायला सांगितलं, आणि वडीलही हसायला लागतात. रडणाऱ्या मुलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच ट्रेण्ड होत आहे.

Web Title: Father makes 3-year-old daughter fill bowl with tears for watching excess television

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.