Lokmat Sakhi >Social Viral > लेकीसाठी काहीपण! मार्क झकरबर्ग लेकीसाठी झाला नेल आर्टिस्ट, पाहा कशी लावली नेल पॉलिश

लेकीसाठी काहीपण! मार्क झकरबर्ग लेकीसाठी झाला नेल आर्टिस्ट, पाहा कशी लावली नेल पॉलिश

‘Father of the Year’: Mark Zuckerberg turns nail artist for daughter in viral Instagram video : मार्क झुकरबर्ग आपल्या साध्या राहणीमानासाठीही ओळखले जातात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2024 12:15 PM2024-10-18T12:15:28+5:302024-10-18T13:01:48+5:30

‘Father of the Year’: Mark Zuckerberg turns nail artist for daughter in viral Instagram video : मार्क झुकरबर्ग आपल्या साध्या राहणीमानासाठीही ओळखले जातात..

‘Father of the Year’: Mark Zuckerberg turns nail artist for daughter in viral Instagram video | लेकीसाठी काहीपण! मार्क झकरबर्ग लेकीसाठी झाला नेल आर्टिस्ट, पाहा कशी लावली नेल पॉलिश

लेकीसाठी काहीपण! मार्क झकरबर्ग लेकीसाठी झाला नेल आर्टिस्ट, पाहा कशी लावली नेल पॉलिश

वडिल आणि मुलीचं नातं म्हणजे आकाश (Mark Zuckerberg). ज्याला कोणतीही सीमा नाही, आणि हे प्रेम अमर्यादित असतं. वडील कितीही कामात व्यग्र असुदे, तो आपल्या मुलीसाठी खास वेळ काढतोच (Viral Video). मुली मोठ्या जरी झाल्या, तरीही वडिलांसाठी ती लहान बाहुलीच असते (Father-Daughter Bond).

आता मेटा कंपनीचे सीईओ व संस्थापक मार्क झुकरबर्गच्या घरीही काही वेगळी गोष्ट नाही. आपल्याला घरबसल्या एकमेकांशी जोडणारे मार्क झुकरबर्ग मुलीसाठी नेल आर्टिस्ट बनले आहेत. ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण त्यांनी खुद्द आपल्या इन्स्टाग्राम अकांऊटवर व्हिडिओ पोस्ट केला. ज्यात त्यांनी आधी नेल आर्ट कसे करतात हे शिकून घेतलं, आणि मग मुलीच्या नखांवर त्याचा प्रयोग केला(‘Father of the Year’: Mark Zuckerberg turns nail artist for daughter in viral Instagram video).

लेकीसाठी मार्क झुकरबर्ग बनले नेल आर्टिस्ट


मार्क झुकरबर्ग हे देशातील प्रतिष्ठित नाव. त्यांनी व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी ॲप्सद्वारे लोकांना जोडलं. पण त्यांचं वैयक्तिक आयुष्य कसे असेल? कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ कसा घालवत असतील? असा प्रश्न तुमच्याही मनात आलं असेल. याचंच उत्तर एका व्हिडिओतून मिळालं आहे.

फक्त १ महिना गव्हाची पोळी नाही खाल्ली तर...? वजन कमी होते? नक्की खरं काय?

व्हायरल व्हिडिओत मार्क झुकरबर्ग  हेडसेट Quest 3S डोळ्यांवर लावतात. नेलपेंट कशी लावयची, असं त्या हेडसेटला विचारतात. त्यानंतर मग Quest 3S छोट्या-छोट्या स्क्रीनसह नेलपेंट कशी लावायची हे दाखवते. मग ते लेकीला टेबलवर बसवतात. आणि नेल आर्ट करण्यास सुरुवात करतात.

नंतर ते नेलपेंटच्या विविध रंगातून लाल - निळा रंग निवडतात. ते रंग लेकीच्या नखांवर लावतात. नेल आर्ट पूर्ण करण्यासाठी चमकीली कोट करतात. नेल आर्ट झाल्यानंतर लेक प्रचंड खुश होते. टेक्नॉलॉजी, बोर्डरूम मीटिंग्जच्या पलीकडे, मार्क झुकरबर्ग एक गोड मुलीचे फेवरीट वडीलही आहेत, हे या व्हायरल व्हिडिओद्वारे दिसून आलं.

व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून कौतुक


व्हायरल व्हिडिओवर मार्क यांनी ‘वडिलांचे स्किल्स सुधारण्यासाठी Quest 3S वापरणे म्हणजे एक नवीन अनुभव आहे’, असं कॅप्शन दिलं आहे. व्हिडिओ साहजिक व्हायरल तर झालाच, शिवाय नेटकऱ्यांनी मार्क यांचं विशेष कौतुकही केलं.

मलायका अरोरा रोज पिते ‘या’ फळाचे ज्यूस, पन्नाशीत तिच्यासारखा ग्लो हवा चेहऱ्यावर तर हा घ्या उपाय

एकाने ‘फादर ऑफ द इयर, नेलं आर्टिस्ट’, असं म्हणत मार्क यांचं कौतुक केलं. याआधीसुद्धा मार्क झुकरबर्ग यांनी टेक्नॉलॉजीचा वापर करून, लेकीच्या केसांची वेणी बांधली होती. तो व्हिडिओ देखील तुफान व्हायरल झाला होता. 

Web Title: ‘Father of the Year’: Mark Zuckerberg turns nail artist for daughter in viral Instagram video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.