बाप - लेकीचं नातं हे जगातील सर्व नात्यांपैकीच एक असलं तरीही ते तितकंच खास असत. ज्या मुलींचं आपल्या वडिलांसोबतच नातं सुंदर असतं. त्यांच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यातील आठवणी या सुंदरच असतात. सर्वात खास नाते म्हणजे वडील आणि मुलीचे नाते. वडील हे मुलीचे पहिले मित्र, संरक्षक आणि सूपरहिरो असतात. प्रत्येक वडील आपल्या मुलीसाठी लहानपणा पासूनच तिच्या प्रत्येक लहान लहान गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. जेणेकरून ती आनंदी राहावी .आपल्या मुलीच्या चेहऱ्यावरचे हसू बघण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतात(Woman on Plane Captures Viral Moment Dad Signals a Message From His Boat).
वडील आणि मुलीचं बाँडिंग आणि ट्युनिंग हे इतर नात्यांपेक्षा वेगळंच असत. या नात्यातील गोडवा घराचे सौंदर्य अनेक पटींनी वाढवतो. पुरुष जेव्हा मुलीचा बाप होतो तेव्हा त्याच्या स्वभावात अनेक बदल दिसून येतात. तो अधिक भावनिक आणि काळजी घेणारा बनतो. आई आणि मुलगी यांच्यातलं प्रेम दिसतं, मात्र आई एवढंच प्रेम करणाऱ्या बाबांचं प्रेम बरेचदा दिसत नाही. खरं तर, आजच्या पिढीतल्या मुलंमुली, सर्वांचंच त्यांच्या वडिलांशी बऱ्यापैकी अनौपचारिक आणि मोकळं नातं असतं. पूर्वी वडील म्हणजे शिस्तीचा बडगा उगारणारे, धाक लावणारे असं साधारण चित्र होतं; पण आज हे चित्र पूर्णपणे बदललंय. ‘डॅड’ आता मुलामुलींसाठी ‘ड्युड’ असतात; पण त्यातही मुली आणि वडील यांची केमिस्ट्री वेगळीच असते! साधारणपणे मुलीच्या जन्मापासूनच वडिलांच्या मनात तिच्याविषयी एक हळवा कोपरा असतो. इतरांच्या बाबतीत बऱ्यापैकी कडक असणारे बाबा तिच्याबाबतीत मात्र हळवे असतात. ‘पापा की परी’, ‘डॅडीज गर्ल’ असे शब्द आपण नेहमी ऐकतो. तसे हॅशटॅग्जही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होताना दिसतात. सध्या ‘अहो बाबा’ पासून ‘ए बाबा’पर्यंतचा एक प्रवास दिसून येतो आणि त्या प्रवासात मुलगी आणि वडील कदाचित एकमेकांच्या अधिक जवळ आले आहेत. अशीच काहीशी एक घटना सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे(Father Signals Daughter With an Infinity Sign From the Ocean as She Takes Off On a Plane to Europe, Wholesome Video Goes Viral).
लेकीच्या प्रेमापोटी वडिलांनी केले असे काही की...
लॉसएंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमान युरोपला रवाना होत असताना पॅसिफिक महासागरातील एका बोटीतून एका तरुणीच्या वडिलांनी तिला बोटीतून इशारा देत असलेल्या एका सोशल मीडिया व्हिडिओने संपूर्ण नेटकऱ्यांची मन जिंकली आहेत. या इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, एक मुलगी युरोपच्या सहलीला विमानांत बसून निघाली असलयाचे दिसत आहे. ही मुलगी विमानांत बसून आपल्या प्रवासाला सुरुवात करते, अशी या व्हिडिओची सुरुवात होते. मुलीने आकाशात विमान उडाले तेव्हाच क्षण आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर केला आहे. ती मुलगी जेव्हा विमानाच्या खिडकीतून बाहेर पाहते तेव्हा तिचे वडील खाली असणाऱ्या समुद्रात एका बोटीत बसून पाण्यावर इंग्रजीतील इन्फिनिटी (Infinity) चिन्ह काढून तिला निरोप देत असलयाचे दिसत आहे. इंग्रजीतील इन्फिनिटी (Infinity) या चिन्हाचा अर्थ होतो, अनंत, अपार. ही मुलगी पहिल्यांदाच युरोपला इतक्या लांब आपल्या कुटुंबाला सोडून एकटी सोलो ट्रिप करण्यासाठी निघाली होती. तेव्हा तिचे वडील तिला शेवटचा विदाईचा संकेत देण्यासाठी बोटीसह वाट पाहत होते. मी तुझ्यावर अनंत, अपार प्रेम करत राहीन, असा त्यांचा संदेश होता. "तू जरी तुझ्या पहिल्याच सोलो ट्रिपला जात असली तरीही माझे प्रेम तुझ्या पाठिशी कायम राहील, असा मेसेज त्यांना आपल्या मुलीला द्यायचा होता.
केरळच्या महिलांचा अनोखा डान्स विक्रम, पाहा नृत्याचा व्हायरल व्हिडिओ, डोळ्याचे पारणे फिटते...
नेटकरी सुद्धा झाले भावुक...
हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत, एका बापाचे आपल्या मुलीवरचे निखळ आणि बिनशर्त प्रेम दिसून येत आहे. लॉस एंजेलिसच्या २३ वर्षीय तरुणीने तिच्या विमानाच्या खिडकीतून हा भावनिक क्षण शूट केला असल्याचे समजते आहे. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड केल्यापासून या पोस्टला १.३ दशलक्षाहून अधिक वापरकर्त्यांनी लाईक केले आहे आणि ९,५०० हून अधिक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत.