लहान मुलांना प्राणी हे खूप आवडतात. त्यातल्या त्यात कुत्रं मांजरी हे तर त्यांचे आवडते. घरात कुत्रं आणायचंच हा हट्ट तर अनेक लहान मुलं आपल्या आई वडिलांकडे धरतात. काहींचा हट्ट पूर्ण होतो तर काहींचा नाही. पण प्राण्यांशी खेळतांना मुलांना होणारा आनंद हा अद्वितीय असतो. मुलांच्या प्राण्यांबद्दलच्या संवेदना खूप हळव्या असतात. अनेक मुलांना कुत्र्या- मांजरीला हटकलेलं, रागानं दूर लोटलेलं चालत नाही. मुलांना प्राण्यांबद्दल काय वाटतं याचा अंदाज मोठे लावूच शकत नाही. सोशल मीडियावरचा एक व्हिडीओ व्हायरल (viral video on social media) झालाय तो याच कारणामुळे. वडिलांनी भेट (father gifted his son a new puppy) म्हणून दिलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला कुशीत घेताना या मुलाला इतका आनंद झाला की तो मुसमुसून रडायलाच लागला. ज्याप्रमाणे आई पहिल्यांदा आपल्या बाळाला हातात घेतल्यानंतर हळवी होते त्याचप्रमाणे हा व्हिडीओतला मुलगाही त्या कुत्र्याच्या पिल्लाला कुशीत घेतल्यानंतर हळवा झालेला आहे. हा व्हिडीओ पाहाताना पाहाणाऱ्याच्या चेहेऱ्यावर हसूही उमटतं आणि डोळ्यात पाणीही येतं.
Image: Google
पाहाणाऱ्यालाही हळवा करणारा हा व्हिडीओ ' मॅजिकलीन्यूज' या इन्स्टा अकाउंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओवर 4,389 युजर्सने कमेंट्स लिहिल्या असून या व्हिडीओला सहा लाख आठ हजार यूजर्सने लाइक केलं आहे.
Image: Google
या व्हिडीओतल्या मुलाला आधी त्याचे वडील बघ तुझ्यासाठी गोड कुत्र्याचं पिल्लू आणलंय असं म्हणतात. पण वडिलांनी खेळण्यातलं कुत्र्याचं पिल्लू आणलं असेल असं वाटून हा मुलगा आधी डोळे झाकून् त्याकडे दुर्लक्ष करतो. पण डोळे उघडल्यावर त्याला हे खरंच जिवंत पिल्लू आहे हे कळल्यावर मुलाला आनंद होतो. एखाद्या लहान बाळाला आईनं कुशीत घ्यावं त्यापध्दतीनं तो मुलगा त्या कुत्र्याच्या पिल्लाला कुशीत घेतो आणि त्याच्या त्या मऊ ऊबदार स्पर्शानं तो हळवा होवून हमसून हमसून रडायलाच लागतो. मुलाच्या भावना त्या वडिलांनाही कळतात आणि तेही मुलाच्या डोक्यावरुन प्रेमानं हात फिरवत त्याला कुरवाळतात.
यूजर्सला या व्हिडीओतील लहानग्या मुलाचं जेवढं कौतुक वाटलंय तितकीच प्रशंसा त्यांनी मुलाच्या भावना ओळखून त्याला कुत्र्याचं पिल्लू भेट देणाऱ्या त्या मुलाच्या वडिलांचीही केली आहे. एका युजर्सने मुलाला त्याचा खरा मित्र मिळाल्याचा आनंद झाल्याचं म्हटलं आहे तर एका यूजरनं आपल्याला वडील ज्या प्रेमानं मुलाकडे बघतात ती नजर खूप आवडल्याचं म्हटलं आहे. तर अनेक यूजर्सना कुत्र्याचं पिल्लू बघून मुलाच्या चेहेऱ्यावर उमटलेले भाव भावलेले आहेत. ज्या प्रकारे हा मुलगा कुत्र्याचं पिल्लू कुशीत घेताच भावूक झाला ते बघता हे कुत्र्याचं पिल्लू हा मुलगा खूप प्रेमानं सांभाळेल, त्याला सांभाळता सांभाळता हा मुलगाही संयम शिकेल असा विश्वास अनेक यूजर्सना वाटतो आहे. हळ्वे भाव व्यक्त करणारा हा व्हिडीओ एकदा पाहून पोटच भरत नाही.