Join us  

विमानात स्वतःच्याच मुलाशी गप्पा मारणाऱ्या वडिलांना एका अनोळखी महिलेने चांगलेच सुनावले..कारण काय तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2022 5:27 PM

Father was Talking to the Younger son in the flight an angry woman said : विमान प्रवासातही भांडणारे लोक कमी नाहीत....

ठळक मुद्देविमान प्रवासातील अनेक किस्से आपण ऐकत असतो, त्यातलाच हा एककाही तासांच्या प्रवासातही लोक लहान-सहान गोष्टींवरुन वाद घालताना दिसतात..

विमान प्रवास म्हणजे सगळ्यात कंटाळवाणा प्रवास असं अनेक जण म्हणतात. विमानाचा प्रवास तर बरेच तासांचा असतोच पण याठिकाणी अनेकदा हलायलाही जागा नसते त्यामुळे विमानात काहींना खूप बोअर होते. इतकेच नाही तर विमातान कित्येकदा काही ना काही घटना घडताना दिसतात. कधी एखादे कपल दारु पिऊन धिंगाणा घालते तर कधी जागेवरुन प्रवाशांची जुंपते. काही वेळा विमान गळत असल्याने प्रवाशांची गैरसोय होते तर कधी आणखी काही. विमानात घडणारे हे किस्से सोशल मीडियावर किंवा माध्यमांमध्ये वेगाने पसरतात आणि त्यावर बरीच चर्चाही होताना दिसते. नुकतीच अशीच एक घटना घडली आणि त्याविषयी बरीच चर्चा झाली. एका लहान मुलाला विमानातून घेऊन जाणाऱ्या एका वडिलांना या मुलाशी गप्पा मारण्यावरुन एका महिलेने चांगलेच भांडण केले. या वडीलांच्या बोलण्याचा आपल्याला त्रास होत असल्याचे या महिलेचे म्हणणे होते (Father was Talking to the Younger son in the flight an angry woman said...). 

(Image : Google)

लहान मुलांना घेऊन प्रवास करणाऱ्या पालकांसाठी या मुलांना सतत एंटरटेन करणे वाटते तितके सोपे काम नक्कीच नसते. मुलांना खेळायला खेळणी किंवा मोकळी जागा नसेल तर ते लगेच कंटाळून जातात. मात्र प्रवासात ते कंटाळू नयेत यासाठी त्यांना आजुबाजूच्या वेगवेगळ्या गोष्टी दाखवणे, बसल्या बसल्या त्यांच्याशी काही खेळ खेळणे, गप्पा मारणे असे करुन त्यांना रमवावे लागते. असेच एक वडील आपल्या ३ वर्षाच्या मुलाशी विमानात गप्पा मारत होते. आपल्या मुलाशी बोलत असताना या व्यक्तीच्या बाजुला बसलेल्या एका महिलेने त्याला शांत बसण्यास सांगितले. महिलेने अशाप्रकारे केलेली सूचना ऐकून हा व्यक्ती आधी काहीसा आश्चर्यचकित झाला. 

(Image : Google)

हे बाप-लेक सुट्ट्यांसाठी आपल्या घरी चालले होते. त्यावेळी त्यांना विमानात मधली सीट मिळाली होती. विमानात बसताना हे ३ वर्षाचे बाळ आधी बराच वेळ झोपलेले होते. मात्र ते उठल्यावर त्याला रमवण्यासाठी त्याचे वडील त्याच्याशी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत होते. यावेळी बाजूला बसलेली एक महिला झोपली होती. या वडीलांच्या गप्पांचा तिला त्रास होत असल्याने तिने त्यांना गप्प बसण्यास सांगितले. आपली बडबड विमानातील कोणीच ऐकू इच्छित नाही असे त्या महिलेने सांगितले. त्यावेळी तुम्ही कानात हेडफोन्स घाला म्हणजे तुम्हाला माझे बोलणे ऐकू येणार नाही असे हा व्यक्ती म्हणाला. आपल्याकडे हेडफोन्स नाहीत असे या महिलेने सांगितले. आपल्या बाळाला रमवणे आवश्यक असल्याने या व्यक्तीने मुलाशी गप्पा सुरूच ठेवल्या. महिलेने या व्यक्तीची विमान कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली त्यावेळी त्यांनी तिला दुसरीकडे जागा देतो असे सांगितले. मात्र आपण खिडकीतील सीटसाठी जास्तीचे पैसे भरलेले असल्याने आपण दुसरीकडे जाणार नाही असे त्या महिलेने सांगितले. काही वेळ हे भांडण सुरू राहिले मात्र नंतर आपण आपल्या मुलाशी गप्पा मारतच राहीलो असे त्या वडीलांनी सांगितले.  

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया