Lokmat Sakhi >Social Viral > पांढऱ्या शर्टाच्या कॉलरवरचे हट्टी डाग घासूनही निघत नाही? फक्त २ उपाय; कपडे दिसतील चकाचक

पांढऱ्या शर्टाच्या कॉलरवरचे हट्टी डाग घासूनही निघत नाही? फक्त २ उपाय; कपडे दिसतील चकाचक

Fed up with stubborn stains on shirt collar? Try these 2 tips to remove them easily : कपड्यांवरचे अंडरआर्म्स आणि कॉलरवरचे हट्टी डाग कसे काढायचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2024 05:11 PM2024-07-25T17:11:40+5:302024-07-25T17:12:41+5:30

Fed up with stubborn stains on shirt collar? Try these 2 tips to remove them easily : कपड्यांवरचे अंडरआर्म्स आणि कॉलरवरचे हट्टी डाग कसे काढायचे?

Fed up with stubborn stains on shirt collar? Try these 2 tips to remove them easily | पांढऱ्या शर्टाच्या कॉलरवरचे हट्टी डाग घासूनही निघत नाही? फक्त २ उपाय; कपडे दिसतील चकाचक

पांढऱ्या शर्टाच्या कॉलरवरचे हट्टी डाग घासूनही निघत नाही? फक्त २ उपाय; कपडे दिसतील चकाचक

पांढरे कपडे प्रत्येकाच्या पर्सनॅलिटीला शोभून दिसतात (Cleaning tips). परंतु, पांढऱ्या पोशाखावर डाग पडल्यास किंवा, धुतल्यानंतर पिवळट डाग पडल्यावर, कपड्याची शोभा कमी होते (Stain removal). हे डाग सहसा घासून निघत नाहीत. अशावेळी महागडे डिटर्जंट, साबण यांचा वापर करून फारसा फायदा होत नाही.

मुख्य म्हणजे पिवळट डाग शर्टाच्या कॉलरसोबतच  हाताच्या कफ किंवा अंडरआर्म्सवर पडलेले दिसतात. घामामुळे किंवा इतर कारणांमुळे पडलेले हे डाग, मेहनत आणि विविध उपाय करूनही निघत नाही. जर पिवळट डागांमुळे कपड्यांची शोभा कमी झाली असेल तर, २ घरगुती गोष्टींचा वापर करून पाहा. यामुळे डाग होतील गायब, पांढरा शर्ट किंवा कपडे कायम नव्यासारखे दिसतील(Fed up with stubborn stains on shirt collar? Try these 2 tips to remove them easily).

हायड्रोजन पेरोक्साइड

पांढऱ्या कपड्यांवरील डाग काढून टाकण्यासाठी हायड्रोजन पेरोक्साइड हा एक उत्तम पर्याय आहे. डागावर हायड्रोजन पेरोक्साईड घाला आणि घासून घ्या. नंतर एका बादलीत पाण्यात डिटर्जंट घालून मिक्स करा. त्यात कपडे भिजत ठेवा. २-३ तासांनंतर कोमट पाण्याने कपडे धुवा. यामुळे पिवळट डाग हलके होतील, या पद्धतीने धुतल्यास लवकर डाग गायन होतील.

वाढीच्या वयात मुलं फिट व्हावी असं वाटत असेल तर खाऊ घाला ५ पदार्थ, आजीपणजीच्या काळातला सोपा उपाय

लिंबू आणि बेकिंग सोडा

पांढऱ्या कपड्यांवरील पिवळट डाग काढण्यासाठी लिंबू आणि बेकिंग सोड्याचा वापर करून पाहा. यासाठी एक चमचा एका बाऊलमध्ये एक चमचा बेकिंग सोडा आणि त्यात १ ते २ चमचे लिंबाचा रस मिसळा. तयार मिश्रण डागांवर लावा, आणि घासून घ्या. यानंतर, कोमट पाण्याने कापड धुवा, डाग सहज निघून जाईल.

हे डाग स्वच्छ कसे करावे?

- पांढऱ्या कपड्यावर शाईचे डाग असल्यास रबिंग अल्कोहोलचा वापर करा. धुण्यापूर्वी कपड्यावर लावा. काही वेळ तसेच ठेवा. नंतर कपडे पाण्याने धुवा.

पोट साफ - आतडी तंदुरुस्त ठेवायची? करा ४ स्टेप्स, २१ दिवसात वजन घटेल - त्वचाही चमकेल

- कपड्यांवर ग्रीस किंवा तेलाचे डाग असल्यास बेकिंग सोडा लावून चोळा. धुण्यापूर्वी काही मिनिटे तसेच राहू द्या. नंतर पाण्याने कपडे धुवा.

- कपड्यांवर खाण्यापिण्याचे डाग असल्यास, डाग असलेल्या जागेवर व्हिनेगर लावून घासा. धुण्यापूर्वी काही मिनिटे तसेच ठेवा. पाण्याने नंतर कपडे धुवा.

Web Title: Fed up with stubborn stains on shirt collar? Try these 2 tips to remove them easily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.