Join us

ऑफिसमध्ये दुपारी झोप येते? ३ सोप्या ट्रिक्स, झोप चटकन उडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2023 20:07 IST

Feeling drowsy in the afternoon? Here's help! दुपारी ऑफिसमध्ये येणारी झोप कशी टाळाल? ३ ट्रिक्स, झोप - उडेल, कामावर लक्ष लागेल..

सकाळी - सकाळी कामावर जाण्याचा उत्साह हा वेगळाच असतो. पण जस - जशी दुपार होत जाते, हा उत्साह देखील थोडा - फार कमी होतो. याला कारण कदाचित दुपारचं जेवण देखील असू शकतं. कोरोना या वैश्विक महामारीत अनेकांना वर्क फ्रॉम होम दिलेलं होतं. घरी काम करण्याची सवय अनेकांची सुटली नाही. त्यामुळे कामात दुपारचा वेळ हा कंटाळवाणा जातो.

काहींना रात्री जागायची व दुपारी झोप काढायची सवय असते. ऑफिसमध्ये दुपारची झोप आल्यावर बॅड इम्प्रेशन पडते. दुपारच्या झोपेची ही समस्या सोडवायची असेल तर, ३ सोप्या ट्रिक फॉलो करून पाहा. या ट्रिकमुळे कदाचित दुपारची झोप उडेल(Feeling drowsy in the afternoon? Here's help!).

पॉवर नॅप

झोपेतून सुटका मिळवण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे झोपून जाणे. ही झोप आपल्याला ८ तासांसाठी घ्यायची नसून, फक्त २० मिनिटांची घ्यायची आहे. या प्रकारच्या झोपेला पॉवर नॅप असे म्हणतात. पॉवर नॅपमुळे झोप तर उडतेच, यासह मेंदूला आराम करण्यासाठी आवश्यक वेळ मिळतो.

नेलकटरसोबत असणाऱ्या दोन सुऱ्यांचे नक्की काम काय? कशासाठी त्यांचा वापर होतो?

स्ट्रॉन्ग कॉफी

दुपारच्या झोपेपासून सुटका हवी असल्यास, स्ट्रॉन्ग कॉफी प्या. कॉफीमध्ये असलेले कॅफिन मेंदूची क्रिया आणि मज्जासंस्था सक्रिय करते. ज्यामुळे झोप उडते. दुपारचं जेवण झाल्यानंतर लगेच या उपायाचा वापर करू नका. काही वेळेनंतर कॉफी प्या.

फ्रिजचा डोअर रबर कळकट - खराब झालाय? ५ टिप्स, स्वच्छता झटपट-फ्रिज दिसेल नव्यासारखा

थंड पाण्याने चेहरा धुवा व पंख्याजवळ बसा

ऑफिसमध्ये दुपारच्या वेळेस झोप येत असेल तर, थंड पाण्याने चेहरा धुवा. थंड पाणी शरीराला आराम देऊन ऊर्जा आणण्यास मदत करते. चेहरा धुतल्यानंतर पंख्याजवळ बसा. ज्यामुळे आपल्या शरीराचे तापमान सामान्य होईल व झोप देखील उडेल.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यसोशल व्हायरल