आपल्या आवडत्या पदार्थाचा व्हिडिओ किंवा फोटो पाहिल्यानंतर प्रचंड भूक लागते. पोटात कावळे ओरडायला लागतात. पण डाएट किंवा आरोग्याच्या दृष्टीने विचार केल्यास, आपण मन मारून ते पदार्थ खाणं टाळतो. काही वेळेला घरात किंवा बाहेर गेल्यानंतर जवळपास खाण्यासाठी काही सापडत नाही. भूक तर लागते पण खायलाच अन्न नसेल तर काय करावं? या प्रश्नाचं उत्तर कदाचित तुम्ही देखील शोधत असाल. अशा परिस्थितीत आपण आपल्या आवडत्या पदार्थाचे फोटो पाहून देखील भूक भागवू शकता.
हे ऐकून तुम्हाला गंमत वाटली असेल. पण एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, आवडत्या पदार्थाचा फोटो पाहून भूक भागवता येते. 'एपेटाइट' नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, जेवढ्या वेळा आपण अन्नाची छायाचित्रे पाहतो, काही वेळानंतर ही भूक कमी होते(Feeling hungry? Looking at pictures of food on your phone might help, reveals a study).
पदार्थाचे फोटो ३० पेक्षा अधिक वेळा पाहा
या अभ्यासाचे लेखक जार्क अँडरसन सांगतात की, ''या शोधात ज्या लोकांनी सहभाग घेतला होता, त्यांनी आपल्या आवडत्या पदार्थाचे फोटो ३० वेळा पहिले. यानंतर त्यांचे पोट भरल्यासारखे जाणवले. यात ज्यांनी अधिक वेळा पदार्थाचे फोटो पाहिले. त्यांनी कमी पदार्थाचे सेवन केले. त्यांची भूक कमी झाली. या अभ्यासात सहभागी लोकांना काहीही न खाता पोट भरल्यासारखे वाटत होते.''
स्वयंपाकघरात खूप पसारा होतो, आवरता आवरत नाही? ८ टिप्स, स्वयंपाकघर कायम चकाचक
कल्पना करून मिळतो रियल रिसपॉन्स
ऑरहस युनिव्हर्सिटीच्या मते, या स्टडीला ब्रेन रिसर्चमधील 'ग्राउंडेड कॉग्निशन थिअरी'च्या सहाय्याने चांगल्या प्रकारे समजून घेण्यात येऊ शकते. कल्पना करा की आपण कच्च्या आंब्याचा तुकडा खात आहात, त्यावर थोडी मिरची आणि मीठ देखील आहे. नुसती कल्पना करूनच नक्कीच आपल्या तोंडातही पाणी सुटले असेल.
ऑफिसमध्ये दुपारी झोप येते? ३ सोप्या ट्रिक्स, झोप चटकन उडेल
यासंदर्भात, जार्क अँडरसन सांगतात, ''अन्नाची कल्पना करूनही आपल्याला तोच प्रतिसाद मिळतो, जे पदार्थ खाताना आनंद मिळतो. या करणामुळे जेवणाचा फोटो पाहूनही पोट भरल्यासारखे वाटते.''