देश चालवण्यापासून ते अंतराळात जाण्यापर्यंत अनेक क्षेत्रात महिलांनी अव्वल स्थान निर्माण केले आहे. आता एका महिलेचा ट्रक चालवत असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या या क्लिपला 194,000 पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. (Viral video female driver drove the truck) व्हिडिओमध्ये एक ट्रक कॅमेरा फ्रेममध्ये शिरताना दिसत आहे. सुरुवातीला काय होत आहे हे समजणे कठीण आहे. पण क्लिपमध्ये एक महिला सहज ट्रक चालवताना आणि कॅमेऱ्याकडे पाहून हसताना दिसत आहे. (Viral video female driver drove the truck on the tamil nadu road trending)
IAS अविनाश शरण यांनी क्लिपच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'ट्रकचा ड्रायव्हर पुरुष असो की महिला याच्याशी काही देणघेण नाही.' हृदयस्पर्शी व्हिडिओने इंटरनेटवर चर्चांना उधाण आलं आहे. नेटिझन्सनी महिलेचे कौतुक केले आणि कमेंट बॉक्स हार्ट आणि फायर इमोजींनी भरला. एका यूजरने लिहिले की, 'आम्हाला महिलेचा अभिमान आहे. उत्कृष्ट.'
याला म्हणतात नशिब! सकाळी भाजी घेण्यासाठी ५०० चे सुट्टे घ्यायला गेला अन् करोडपती बनला
दुसर्या युजरने म्हटले, 'महिला ड्रायव्हरचे स्माईल जे आश्चर्यकारक आहे.' तिसऱ्या यूजरने लिहिले की, 'महिला ड्रायव्हरचा आत्मविश्वास खूप कमालीचा आहे. शुभेच्छा.' आतापर्यंत ४ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून 22 हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडिओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. अनेकजण या व्हिडिओतील महिलेच्या धाडसाचे कौतुक करत आहेत.