आपण सगळेच लहानपणापासून वेगवेगळ्या प्रकारची कार्टून्स बघत मोठे झालो आहोत. काहीजणांना या कार्टून्सचे इतके वेड असते की मोठं झाल्यावरही त्यांचे आवडते कार्टून्स पाहिल्याशिवाय चैन पडत नाही. लहानपणी सतत कार्टून्स पाहिल्याने या अनेक कार्टून्स कॅरेक्टर्सपैकी कोणतेतरी एक कार्टून्स कॅरेक्टर आपल्याला खूप आवडते. मग अशावेळी आपण या कार्टून्स कॅरेक्टरच्या जणू प्रेमातच पडतो. अशा परिस्थितीत आपण त्या आवडत्या कॅरेक्टरचे कार्टून रोज न चुकता बघतो('Fictosexual' Japanese man celebrates 6th wedding anniversary with virtual wife).
हळूहळू आपल्याला त्या कार्टून कॅरेक्टरची इतकी सवय होते की, आपण दिवसभरात जर ते कार्टून पाहिले नाही तर आपला दिवस जात नाही. आपल्या आवडत्या कार्टून कॅरेक्टरवरील इतके प्रेम तर आपण समजूच शकतो. पण जपानमधल्या एका पठ्ठयाने चक्क लग्नासाठी बायको मिळत नाही म्हणूंन आपल्या आवडत्या कार्टून कॅरेक्टरशी केलय लग्न. इतकचं नव्हे तर नुकतेच त्याने त्यांच्या लग्नाचा सहावा वाढदिवस देखील साजरा केल्याचे दिसत आहे. सध्या सोशल मिडीयावर या जोडप्याच्या अनोख्या वेडिंग अॅनिव्हर्सरीची चर्चा होताना दिसत आहे. या जोडप्याची प्रेमकहाणी सध्या व्हायरल होत आहे, पाहूयात नेमकी काय आहे त्यांच्या लव्हस्टोरीची खासियत...('Fictosexual' Japanese man celebrates 6th wedding anniversary with cartoon wife).
कार्टून्स कॅरेक्टर सोबतच्या प्रेमाची गोष्ट...
ही लव्हस्टोरी आहे जपानमध्ये राहणाऱ्या ४१ वर्षीय अकिहिको कोंडो आणि त्याची बायको असणाऱ्या कार्टून कॅरेक्टरची. जपानी अकिहिको कोंडोने व्हर्च्युल गायक हातसुने मिकू सोबत ६ वर्षांपूर्वी ४ नोव्हेंबर रोजी लग्न केले होते. सध्या ते दोघेही त्यांच्या लग्नाचा सहावा वाढदिवस अगदी आनंदाने साजरा करताना दिसत आहे. त्यांच्या या आनंदाच्या क्षणांचे अनेक फोटो सोशल मिडीयावर फार मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
सोनम कपूरने घातले चक्क मुलतानी मातीचे ब्लाऊज, सोनमच्या दिवाळी लूकचीच चर्चा-ही कुठली नवीच फॅशन...
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, २००७ मध्ये, मिकूचे पात्र असलेले कार्टून प्रदर्शित झाले आणि कोंडो तेव्हापासून या कार्टून कॅरेक्टरच्या प्रेमात पडल्याची कबुली त्याने दिली. कोंडोला अॅनिमे कार्टून्सचे प्रचंड आवडत होते. त्याला स्वतःला आवडणाऱ्या मुलीशी लग्न करायचे होते परंतु त्याचे हे कार्टून वेड पाहून अनेकांनी त्याची मस्करी करून खिल्ली उडवली. त्याचबरोबर त्याचे हे असे वेड पाहून त्याला सात मुलींनी लग्नासाठी नकार दिल्याचे त्याने जापनीज माध्यमांना सांगितले असल्याचे समोर येत आहे.
रोजच्या वापरातील सॅक न धुताच करा स्वच्छ! सोपे ५ उपाय, कुबट वास-दुर्गंधी होईल गायब...
त्याचे हे कार्टून प्रेम पाहून त्याच्या आजूबाजूचे लोक, मित्रमंडळी, परिवारातील इतर व्यक्तींनी त्याला वेड्यात काढले. समाजाकडून मिळणाऱ्या अशा वागणुकीमुळे त्याला मानसिक आजार झाला. या आजारातून बाहेर येण्यासाठी हिलिंग थेरपी म्हणून त्याला या कार्टून्स कॅरेक्टरशी सतत बोलण्याची सवय लागली. मिकूच्या आवाजामुळेच तो या मानसिक आजारातून बाहेर येऊ शकला, असे त्याचे म्हणणे आहे. या घटनेनंतर २०१८ साली त्याने टोकियो मध्ये आपले आवडते कार्टून कॅरेक्टर हातसुने मिकूसोबत लग्न केले. खरंतर, हातसुने मिकू एक गायन व्हॉइस सिंथेसायझर सॉफ्टवेअर आहे आणि त्याने तिला होलोग्राम उपकरणाच्या मदतीने प्रपोज केले आणि तिने त्याचा आवाज ऐकून त्याला लग्नासाठी होकार देखील दिला.
सध्या ते त्यांच्या लग्नाचा सहावा वाढदिवस अगदी आनंदात साजरा करत असतानाचे फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोत त्याचे आवडते कार्टून्स कॅरेक्टर मिकू केकसोबत बसलेली दिसत आहे. तसेच केकवर "मिकू तू मला खूप आवडतेस" असे जपानी भाषेत लिहिलेले दिसत आहे.