Join us  

पदरावरती जरतारीचा मोर नाही तर झळकला फुटबॉल! फिफा वर्ल्ड कपचा फिवर असा की कोलकात्यात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2022 6:30 PM

Kolkata Viral Saree फिफा वर्ल्ड कपची क्रेझ सर्वत्र पसरली आहे. त्यात आता चक्क साडीवर फुटबॉलच्या प्रिंट्स झळकू लागल्या आहेत.

मिष्टी डोई, रसगुल्ला, डिझायनर साड्या, दुर्गापूजा यासह अनेक सुंदर गोष्टींसाठी कोलकाता हे शहर ओळखलं जातं. सध्या सर्वत्र फिफा विश्वचषक 2022 ची क्रेझ पाहायला मिळत आहे. कतारमध्ये होत असलेल्या फुटबॉल विश्वचषक अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. कोलकातासह पश्चिम बंगालच्या नागरिकांचे फुटबॉल प्रेमही अत्यंत भन्नाट आहे. त्यामुळेच आता  कोलकात्यात साड्यांवरही फुटबॉलच्या प्रिंट्स झळकत आहेत. या साड्या खूप व्हायरल होत असून, साडी खरेदीसाठी लांबच लांब रांगा लागत आहे.

फिफाची क्रेझ साडीवर

कोलकाता येथील प्रसिद्ध बलराम शाह अँड सन्स येथे खास जामदानी साड्यांवर अनोखे डिझाइन तयार केले जात आहेत. खरं तर, फिफा विश्वचषकपासून प्रेरित होऊन येथील कारागिरांनी, साडीवर फुटबॉल खेळाडूंचे चित्र तयार केले आहे.

मुख्य म्हणजे या साडीच्या पदरावर ब्राझील आणि अर्जेंटिनातील फुटबॉलपटुंची चित्र तयार केले आहे. यासोबतच साडीवर लहान फुटबॉलचे डिझान्स छापलेले आहेत. ही साडी खरेदी करण्यासाठी लोकांची मोठी रांग लागत असल्याचे दुकानाचे मालक राजा साहा यांनी सांगितले.

दुकानाचे मालक राजा साहा यांनी व्हायरल साडीबद्दल सांगतात, "फुटबॉल डिझाइन असलेली ही साडी खरेदी करण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. आम्ही ही खास साडी मूळ जामदानी कापडावर बनवली आहे सध्या फिफा वर्ल्ड कपची क्रेझ पाहून ही साडी बनवली आहे."

दरम्यान, ही साडी सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, नेटकऱ्यांनी साडीच्या व्हायरल फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.या साडीची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२