कुटुंबात किंवा मित्रमंडळींमध्ये कोणाचे लग्न म्हटलं की एक मस्त माहोल असतो. हळद, मेहंदी, संगीत आणि मुख्य लग्न असे बरेच सोहळे असतात आणि या सोहळ्यात नाचणे, गाणे, मनसोक्त खाणे, गप्पा-गोष्टी अशी सगळीच धमाल असते. अनेकदा आपण आपल्या जवळच्या मंडळींनाही कोणाच्या तरी लग्नाच्या निमित्ताने भेटत असतो. त्यामुळे याठिकाणी आपण सगळ्या गोष्टी विसरुन मजा करतो. एका लग्नात असाच मजा-मस्तीचा माहोल असताना अचानक मारामारी सुरू झाल्याने अनेकांना काय झाले ते नेमके कळलेच नाही. मात्र या घटनेचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाल्याने सोशल मीडियावर तो वेगाने व्हायरल झाला (social media viral video). पुरुष मंडळी गाण्यावर नाच करत असताना अचानक एक महिला त्याठिकाणी डान्स करण्यासाठी आली आणि कदाचित तिच्यासोबत डान्स करण्यावरुन दोन व्यक्तींमध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली (Fight Between Men in Wedding for Dancing with woman).
लग्नसमारंभात बाजूला स्टोजवर नवरा-नवरी बसलेले असून इतर पाहुणेही खुर्च्यांवर बसलेले दिसत आहेत. तर त्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत काही पुरुष गाण्यांवर मनसोक्त डान्स करताना दिसत आहेत. एकूणच याठिकाणी आनंदाचे वातावरण असल्याचे दिसते. पण काही वेळाने एक पुरुष एका महिलेला याठिकाणी डान्स करण्यासाठी घेऊन येतो. गुलाबी रंगाची साडी नेसलेली ही महिला डोक्यावरुन पदर घेत तशीच या व्यक्तीसोबत छान ठेकेही धरते. पण तितक्यात बाजुचा एक व्यक्ती ज्या पुरुषाने महिलेला सोबत आणले आणि त्याच्यासोबत डान्स करायला लावला त्याला कडेवर उचलतो. इतकेच नाही तर खाली ठेवून त्याला मारायलाही लागतो.
सुरुवातीला आजुबाजूच्या लोकांना अचानक काय झाले याचा अंदाज येत नाही. पण नंतर मात्र मारणाऱ्या पुरुषाला इतर काही पुरुष सावरतात आणि ती महिलाही या भांडणात मधे पडत आपल्यासोबत डान्स करणाऱ्या व्यक्तीला बाजूला करत मार खाण्यापासून वाचवते. हे दोघे कदाचित नवरा-बायको असावेत असा अंदाज आहे. मात्र तिसरा व्यक्ती अचानक हाणामारी का सुरू करतो ते कळत नाही. या मारामारीमुळे सगळ्यांच्याच आनंदावर विरझण पडते आणि सगळा माहोल एकदम सिरीयस होऊन जातो. व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला हे पूर्ण दृश्य दिसू शकते. हा व्हिडिओ २०१९ मधला असला तरी आता तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. युट्यूबवर ११ हजार लोकांनी हा व्हिडिओ लाइक केला असू २५ लाखांहून अधिक जणांनी तो पाहिला आहे. हा प्रसंग नेमका कुठे, कोणाच्या लग्नात घडला याबाबत मात्र माहिती मिळालेली नाही.