बजेट सादर करताना यंदा अर्थमंत्री कोणते नवे मुद्दे मांडणार, काय स्वस्त होणार, काय महाग मिळणार, मध्यमवर्गीयांच्या पदरात काय पडणार याची चर्चा तर नेहमीच होते. पण जेव्हापासून अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेट सादर करत आहेत, तेव्हापासून आणखी एक चर्चाही रंगते.. ती चर्चा असते त्यांच्या साडीची. निर्मला सीतारामन यांचा हातमाग कला प्रकारांना वाव देणे, त्या व्यवसायाला चालना देणे यावर खूप भर असतो. त्यामुळेच वेगवेगळ्या प्रांतातल्या पारंपरिक हातमाग कला त्यांच्या साडीच्या माध्यमातून देशासमोर, जगासमोर याव्या यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. आता यावर्षी २०२५ चं बजेट (Budget 2025) सादर करतानाही त्यांचा हाच प्रयत्न दिसून आला. त्यांनी यावेळी पांढऱ्या रंगाची मधुबनी आर्ट असणारी साडी नेसून बजेट सादर केलं. त्यांच्या त्या साडीमागची गोष्ट मोठीच खास आहे..(Finance Minister Nirmala Sitaraman Wore Madhubani Saree)
मधुबनी आर्ट हा कलाप्रकार मागच्या काही वर्षांपासून खूप चर्चेत आहे. मधुबनी ही मुळची बिहारमधील दरभंगा गावातल्या मधुबनी या खेड्यातली पारंपरिक कला. अगदी रामायण काळापासून ही कला अस्तित्वात आहे असं सांगितलं जातं. तिथल्या दुलारी देवी यांचं या कलेतलं योगदान खूप मोठं.
वय वाढलं तरी हाडं राहतील मजबूत! 'हा' पदार्थ रोज खा- सांधेदुखीचा त्रास कधीच होणार नाही
त्यांच्या आयुष्याचा सुरुवातीचा काळ अतिशय खडतर गेला. मोलमजुरी करून त्या पोट भरायच्या. त्या ज्यांच्या घरी घरकाम करण्यासाठी जायच्या त्यांच्याकडूनच त्या ही कला शिकल्या. जणू त्यांच्या हातात ही कला आधीपासूनच होती पण आजवर त्यांना ती साकारण्याची संधी मिळालेली नव्हती. हळूहळू त्या या कलेमध्ये पारंगत झाल्या.
महागड्या प्रोटीन शेकमध्ये कशाला पैसे घालवता? ४ स्वस्तात मस्त पदार्थ खा, भरपूर प्रोटीन्स मिळतील
त्यांच्या हातची कला पेंटींगच्या, चित्रांच्या माध्यमातून जगासमोर आली आणि तेव्हापासून दुलारी देवी यांचे दिवस पालटायला सुरुवात झाली. त्यांच्या कित्येक पेंटींग आज लाखो रुपयांना विकल्या जातात. त्यांनी मधुबनी कलाप्रकारात जे काही योगदान दिले आहे त्यानिमित्त त्यांना पद्म पुरस्कार देऊनही सन्मानित केलेले आहे. याच दुलारी देवींची आणि निर्मला सितारामन यांची एकदा भेट घडून आली.
मधुबनी कला प्रकार जाणून घेण्यासाठी निर्मला सितारामन यांनी मिथीला आर्ट इन्स्टिट्यूटला भेट दिली होती. त्यावेळी त्यांची भेट दुलारी देवींशी झाली.
या भेटीमध्ये दुलारी देवी यांनी स्वत:च्या हाताने तयार केलेली मधुबनी प्रिंटची साडी अर्थमंत्र्यांना भेट म्हणून दिली आणि ही साडी त्यांनी बजेट सादर करण्यासाठी एकदा नेसावी अशी इच्छा व्यक्त केली. हीच ती खास साडी निर्मला सितारामन यांनी आज २०२५ चं बजेट सादर करताना नेसली आहे. पुन्हा एकदा त्यांच्या या कृतीतून त्यांचे कलाप्रेम दिसून आले.