Lokmat Sakhi >Social Viral > First time deaf girl hear the sound : जन्मानंतर ७ वर्षांनी मुलीनं पहिल्यांदा आवाज ऐकला; कानाची मशीन लावताच कोसळलं रडू

First time deaf girl hear the sound : जन्मानंतर ७ वर्षांनी मुलीनं पहिल्यांदा आवाज ऐकला; कानाची मशीन लावताच कोसळलं रडू

First time deaf girl hear the sound : हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अनेक युजर्सनी शेअर केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या मुलीचे नाव नेस्टाया असून ती केनियाची आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 11:49 AM2022-10-30T11:49:35+5:302022-10-30T12:01:14+5:30

First time deaf girl hear the sound : हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अनेक युजर्सनी शेअर केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या मुलीचे नाव नेस्टाया असून ती केनियाची आहे.

First time deaf girl hear the sound got emotional and start reaction | First time deaf girl hear the sound : जन्मानंतर ७ वर्षांनी मुलीनं पहिल्यांदा आवाज ऐकला; कानाची मशीन लावताच कोसळलं रडू

First time deaf girl hear the sound : जन्मानंतर ७ वर्षांनी मुलीनं पहिल्यांदा आवाज ऐकला; कानाची मशीन लावताच कोसळलं रडू

आपल्याला जर काही ऐकूच आले  नाही तर आपले जीवन कसे असेल याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका मुलीला अशी भेट दिली आहे, जी मिळाल्यानंतर ती भावूक झाली आणि रडू लागली. या मुलीला ऐकू येत नव्हते पण मशिन लावल्यानंतर ऐकू लागली. (First time deaf girl hear the sound got emotional and start reaction)

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अनेक युजर्सनी शेअर केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या मुलीचे नाव नेस्टाया असून ती केनियाची आहे. तिचे वय सात वर्षे असल्याचे सांगितले जाते आणि लहानपणापासून तिला ऐकू येत नव्हते. अनेकदा तिच्या कानाची शस्त्रक्रियाही झाली पण प्रत्येक वेळी अपयश आले आणि या मुलीला ऐकू येत नव्हते.

लहान असताना एकदा या मुलीची तब्येत बिघडली आणि त्याच दरम्यान तिच्या कानाचा पडदा फाटला. असे तिचे नातेवाईक सांगतात. त्यामुळे त्यांची श्रवणशक्ती गेली. तेव्हापासून तिला ऐकू येत नव्हते. पण या मुलीने ना हार मानली ना तिच्या घरच्यांनी हार मानली. या व्हिडीओमध्ये मुलीच्या कानात मशीन लावण्यात आले होते.

मासांहारापेक्षा दुप्पट प्रोटीन देतील ५ व्हेज पदार्थ; रोज खा, कायम फिट, मेंटेन राहाल

हे मशीन या मुलीसाठी खूप दिवसांपासून खास बनवले जात होते. मशीन बसवल्याबरोबर वयाच्या सातव्या वर्षी तिला पुन्हा ऐकू येऊ लागले. एवढेच नाही तर ही मुलगी भावूक झाली. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मुलगी खुर्चीवर बसली आहे आणि एक डॉक्टर तिच्या कानात मागे मशीन बसवत आहे. मशीन बसवल्यानंतर ते टाळ्या वाजवतात आणि मुलगी मागे वळून पाहते. हा व्हिडिओ व्हायरल सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 
 

Web Title: First time deaf girl hear the sound got emotional and start reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.