लग्नानंतर अनेक महिला आपल्या फिटनेसकडे अजिबात लक्ष देत नाहीत. घरच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यात त्या इतक्या व्यस्त होतात की त्यांना स्वत:कडे पाहायला अजिबात वेळ नसतो. प्रेग्नंसीनंतर पुन्हा शरीराला योग्य आकारात आणणं कठीण होतं. पण काही महिला जीवनातील चढ उतारांची पर्वा न करता आपली फिटनेस जर्नी सुरू ठेवतात. (Weight loss fat loss diet workout nutrition diet house wife jaipur anju meena fat to fit transformation journey)
अंदू मीणा यांनी यांनी आजतकला सांगितलं की, ''लग्नानंतर सर्व व्यवस्थित होतं पण २०१५ मध्ये माझं मिसकॅरेज झालं, तेव्हा २०१६ ला ही हे पुन्हा घडलं. त्यामुळे माझं वजन खूप वाढलं. मी ओव्हरवेट झाल्याची कल्पना मला डॉक्टरांनी दिली. त्यानंतर मी हलका फुलका व्यायाम करायला सुरूवात केली. त्यानंतर २०१८ मध्ये बाळाचा जन्म झाला. त्यानंतर बाळाची काळजी घ्यायला मला खूप त्रास होत होता. कारण मला आधीच अस्थमा होता. नंतर मला कळलं की जर मी स्वत:कडे लक्ष दिलं नाही तर काहीच करू शकणार नाही.
पुढे त्यांनी सांगितलं की, ''मी व्यायाम करायचे तेव्हा मला घरातले बोलायचे आता मूल झालंय व्यायाम करायची काय गरज आहे. पण माझ्या पतीनं मला साथ दिली. सकाळी कामाचा खूप व्याप असायचा म्हणून मी रात्री व्यायाम करायला सुरूवात केली. नंतर मी जीमला जाऊन वेट ट्रेनिंग करायला सुरूवात केली. माझं वजन ७२ वरून ५० किलो झालं होतं. माझा व्यायाम कोणालाही दिसत नव्हता. माझ्या पतीलाही वाटायला लागलं की मी माझा वेळ घालवत आहे. माझे जीम इक्विपमेंट्स पाहून 'तू आमचं नाक कापणार आहेस' असं सासू सासरे म्हणायचे.
माणसांसारखं शरीर बनवलंस, बिकनीतला फोटो पाहून तर त्यांची तब्येतच बिघडली. त्यावेळी स्पर्धा असल्याची माहिती मी पतीला दिली आणि त्या स्पर्धेत भाग घेतला. नंतर मी डाएटकडे पूर्ण लक्ष दिले. वेटलॉस कोच हायर केल्यानंतर त्यांनी मला पूर्ण डाएट प्लॅन दिला. त्यानंतर माझ्यात बदल दिसायला सुरूवात झाली.''
अंजू इतर महिलांना सांगतात की, ''पोस्ट प्रेग्नंसीत मुलांची जबाबदारी आल्यांतर स्वत:साठी वेळ काढणं कठीण होतं. म्हणून सुरूवातीपासूच योग्य आहार घ्यावा. हिरव्या भाज्या, प्रथिनेयुक्त पदार्थ, मसूर, राजमा, चणे, सोया चंक्स यांचाही आहारात समावेश करावा. याशिवाय काही शारीरिक हालचालीही वाढवा. जर मुल थोडं मोठं असेल तर तुम्ही मुलासोबत घरी किंवा उद्यानातही खेळायला जाऊ शकता, त्यामुळे खूप मदत होईल.''