बहुतांश घरांमध्ये लोकं महागड्या लाकडी फर्निचरचा वापर करतात. कारण लाकडी फर्निचर हे दीर्घकाळ टिकतात. व दिसायलाही आकर्षक व सुंदर दिसतात. बेडपासून ते शोकेसपर्यंत प्रत्येक गोष्ट ही लाकडापासून तयार करण्यात येते. हे फर्निचर वजनाला हलके असतात.
परंतु, लाकडी फर्निचरवर स्क्रॅच लवकर पडतात. ज्यामुळे फर्निचरची शोभा कमी होते. व ते खराब - जुने दिसू लागतात. बऱ्याचदा स्क्रॅचमुळे फर्निचरचा रंग देखील कमी होतो. जर आपल्या घरी असलेल्या फर्निचरवर देखील ओरखडे दिसून येत असतील तर, एक सोपी ट्रिक करून पाहा. या ट्रिकमुळे स्क्रॅच गायब होतील, व फर्निचर नव्यासारखे दिसतील(Fix Wood Scratches with Walnuts).
अक्रोडचा एक छोटा तुकडा करेल स्क्रॅच गायब
लाकडी फर्निचरवरील स्क्रॅच दुरुस्त करण्यासाठी अक्रोड हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. अक्रोडच्या मदतीने हलके स्क्रॅच सहज कमी करता येतील. यासाठी आपल्याला अक्रोडचा एक छोटा तुकडा व मऊ कापडाची आवश्यकता आहे. जर स्क्रॅच खूप मोठे आणि खोल असतील तर ही ट्रिक फेल ठरू शकेल.
किचन नॅपकिन्स धुतले तरी कळकट-कडकच राहतात? ४ टिप्स- नॅपकिन होतील स्वच्छ
लाकडी फर्निचरवरील स्क्रॅच कसे काढायचे?
लाकडी फर्निचरवरील स्क्रॅच काढण्यासाठी अक्रोडाचा एक छोटा तुकडा घ्या. स्क्रॅच पडलेल्या भागावर हलक्या हाताने घासून काढा. काही काळ असे केल्याने फर्निचरवरील स्क्रॅच मार्क्स हळूहळू कमी होतील. यानंतर त्या फर्निचरवर कोणतीही वस्तू ठेऊ नका. अक्रोडाचे तेल फर्निचरचे स्क्रॅच कमी करण्याची प्रोसेस सुरु होईल.
पावसाळा आला, मोबाईल फोन सांभाळा! फोन भिजला तर काळजी करू नका, तातडीने करा 5 गोष्टी
यानंतर कोरड्या - मऊ कापडाने स्क्रॅचचा भाग पुसून काढा. या ट्रिकमुळे फर्निचरवरील स्क्रॅच कमी होतील. यानंतरही पुन्हा स्क्रॅच दिसत असेल तर, ही प्रक्रिया पुन्हा करा.
छोट्या स्क्रॅचवर करेल काम
ही ट्रिक फक्त छोट्या स्क्रॅचवर काम करेल. मोठ्या स्क्रॅचवर ही ट्रिक काम करणार नाही. मोठे स्क्रॅच काढण्यासाठी आपल्याला कारपेंटरची गरज पडू शकते.