Join us  

वाह रे पठ्ठ्या ! प्रेमासाठी घेतली महासागरात उडी, व्हायरल व्हिडिओ पाहून बसेल धक्का..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2022 12:22 PM

Florida Proposal Viral Video प्रेमात अखंड बुडालेले प्रेमीयुगुल काहीही करू शकतात. प्रेमासाठी कायपण म्हणत एका पठ्ठ्यानं चक्क महासागरात उडी मारली. नक्की काय घडलं पहा..

प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं सेम असतं. हे वाक्य आपण अनेक प्रेम कथांमध्ये ऐकलं असेल. प्रेमासाठी प्रेमीयुगुल काहीही करू शकतात. प्रेमामध्ये चांद तारे तोडून आणण्याची गोष्ट अनेक प्रेमवीर करताना दिसून येतात. सोशल मिडीयावर देखील अनेक हटके प्रपोजल व्हायरल होत राहतात. असाच एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका पठ्ठ्यानं आपल्या प्रेयसीसाठी चक्क महासागरात उडी मारून अंगठी काढली. सध्या या हटके प्रपोजलचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

फ्लोरीडामध्ये राहणाऱ्या एका तरुणाने आपल्या प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी बोटीचा निवड केला. प्रियकर स्कॉट आणि त्याची प्रेयसी सुझी हे दोघेही महासागराच्या मधोमध बोटीवर असतात. हे प्रेमीयुगुल रोमॅण्टिक पोज देत आपलं प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात. सुझीला प्रपोज करण्याची ही योग्य वेळ आहे, असं स्कॉटला वाटतं. त्यानंतर खाली गुढघ्यावर बसून तो प्रेयसीला प्रपोज करण्याच्या तयारीत असतो. खिशात ठेवलेला अंगठीचा बॉक्स बाहेर काढताच तो महासागराच्या पाण्यात पडतो. क्षणाचाही विलंब न लावता स्कॉट थेट महासागरात उडी मारतो. नशीब बलवत्तर म्हणून त्याला अगंठीचा बोक्स सापडतो. हा सर्व प्रकार घडल्यानंतर त्याच्या प्रेयसीला खूप हसू येतं. हा व्हिडिओ स्कॉटने त्याच्या फेसबुकवर शेअर केला आहे. ''हे 100 टक्के खरं आहे, 100 टक्के विसरणार नाही'', असं कॅप्शन देत त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

एका मुलाखतीत स्कॉटने घडलेल्या प्रसंगाबद्दल बोलताना म्हटलं, '' “पाण्यात अंगठी पडल्यानंतर सर्व काही अदृश्य दिसत होतं. हे असं घडलं नाही पाहिजे, असं मला वाटत होतं. पण मी पाण्यात उडी मारायला जराही घाबरलो नाही. कारण अंगठी पाण्यात बुडणार असल्याची कल्पना होती, आणि मला अंगठी परत मिळवायची होती. फुप्फुसात पाणी गेल्यानं मला थोडी भीती वाटत होती. पण पाण्यात पडलेली अंगठी सापडल्यानंतर काळजी करण्यासारखं मला काहिचं वाटलं नाही. आणि सुदैवाने ती अंगठी मला मिळाली”

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया