दिवाळीत आपण सगळेच घराची सजावट करण्यासाठी रांगोळी काढतो. शक्यतो आपण घराबाहेरील फरशीवर रांगोळी काढतो. रांगोळी काढण्यापूर्वी आपण लाल गेरुच्या मदतीने फरशी सारवून घेतो. त्यानंतर त्यावर रांगोळीच्या वेगवेगळ्या रंगांचा वापर करून सुंदर, सुबक अशी रांगोळी काढतो. दिवाळीचे तीन ते चार दिवस फरशीवर रांगोळी काढल्याने फरशीचा रंग बदलून जातो, आणि त्यातही फरशी जर पांढरीशुभ्र असेल तर ती जास्तच खराब होते(Follow 5Tips To Clean Rangoli Stains On Floor).
या पांढऱ्याशुभ्र फरशीवर रांगोळीच्या विविध रंगांचे डाग (How to remove rangoli stains from floor) पडतात, तसेच गेरूने सारवल्याने देखील फरशीवर लाल डाग पडतात. असे फरशीवरील डाग खूपच खराब दिसतात. अशा परिस्थितीत, आपण रांगोळी काढून टाकल्यानंतरही हे रांगोळीच्या रंगांचे डाग निघता निघत नाहीत. अशावेळी, हे रांगोळीच्या रंगांचे डाग फरशीवरुन (After Diwali Cleaning) अगदी सहजपणे काढून टाकण्यासाठी सोप्या ट्रिक्सचा वापर करु शकतो. रांगोळीचे रंग आणि गेरूचे डाग फरशीवरुन काढून टाकण्यासाठी नेमकं काय करता येईल ते पाहूयात(How to remove rangoli colour stains from floor).
रांगोळीचे डाग फरशीवरुन काढून टाकण्यासाठी उपाय...
१. फरशीवर काढलेली रांगोळी स्वच्छ करताना सर्वात आधी कोरड्या कापडाचा वापर करावा. काहीजण रांगोळी पुसून स्वच्छ करण्यासाठी पाण्याने भिजवलेल्या कापडाचा वापर करतात. परंतु या ओल्या कापडाने रांगोळीचे रंग अधिकच पसरुन फरशीला चिकटण्याची शक्यता असते. यासाठी रांगोळी काढलेली फरशी स्वच्छ करताना सर्वात आधी रांगोळी कोरड्या कापडाच्या मदतीने गोळा करून उचलावी.
२. रांगोळी काढलेल्या फरशीवरील रांगोळीचे डाग काढून टाकण्यासाठी शक्यतो गरम पाण्याचा वापर करावा. या गरम पाण्यांत आपण भांडी घासण्याचे डिशवॉश लिक्विड सोपं किंवा बाथरुम स्वच्छ करण्याच्या टॉयलेट क्लिनरचे काही थेंब घालून लादी पुसू शकता. यामुळे रांगोळीचे रंग अगदी सहजपणे फरशीवरून निघून जातात.
३. फरशी पुसण्याचा पाण्यांत २ टेबलस्पून लिंबाचा रस आणि १ टेबलस्पून व्हिनेगर मिसळा. या पाण्याने फरशी स्वच्छ पुसून घेतल्यास रांगोळीचे डाग फरशीवरून सहज निघून जातात आणि फरशी स्वच्छ होते.
४. फरशीवरील रांगोळीचे डाग काढण्यासाठी आपण या डागांवर थेट लिंबाचा रस आणि व्हिनेगर देखील घालू शकता. त्यानंतर घासणीच्या मदतीने हे डाग घासून स्वच्छ करावेत. १० ते १५ मिनिटांसाठी ते तसेच ठेवावे त्यानंतर स्वच्छ पाण्याने फरशी धुवून घ्यावी.
५. फरशीवरील रांगोळीचे डाग घालवण्यासाठी आपण डिटर्जंटचा देखील वापर करु शकता. यासाठी डिटर्जंट थेट डागांवर घालूंन त्यावर थोडे पाणी ओतावे. मग घासणी किंवा स्क्रबरच्या मदतीने हे डाग घासून घ्यावेत. मग स्वच्छ पाण्याने फरशी धुवून घ्यावी.