Lokmat Sakhi >Social Viral > साबण - पाण्याशिवाय तेलकट कंगवा स्वच्छ करा, एक सोपी ट्रिक... कंगवा दिसेल नव्यासारखा...

साबण - पाण्याशिवाय तेलकट कंगवा स्वच्छ करा, एक सोपी ट्रिक... कंगवा दिसेल नव्यासारखा...

1 Easy Tips & Tricks To Clean Oily Combs : तेलकट झालेल्या कंगव्यावरील तेल लगेच काढून टाकण्याची सोपी आयडिया... कंगवे होतील स्वच्छ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2023 11:32 AM2023-09-07T11:32:28+5:302023-09-07T11:48:10+5:30

1 Easy Tips & Tricks To Clean Oily Combs : तेलकट झालेल्या कंगव्यावरील तेल लगेच काढून टाकण्याची सोपी आयडिया... कंगवे होतील स्वच्छ...

Follow This 1 Easy Tips To Clean Comb. | साबण - पाण्याशिवाय तेलकट कंगवा स्वच्छ करा, एक सोपी ट्रिक... कंगवा दिसेल नव्यासारखा...

साबण - पाण्याशिवाय तेलकट कंगवा स्वच्छ करा, एक सोपी ट्रिक... कंगवा दिसेल नव्यासारखा...

केस विंचरणे ही एक अतिशय सामान्य गोष्ट आहे. केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी, केसांत गुंता होऊ नये म्हणून दिवसभरात आपण ठराविक वेळानंतर केस विचारतो. व्यस्त जीवनशैलीमुळे केसांची निगा राखणं आपल्यासाठी कठीण जाते. मात्र, केसांच्या बाबतीत छोट्या - मोठ्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक असते. केस धुण्यापसून ते विंचरण्यापर्यंत केसांची काळजी घेणं महत्त्वाचे आहे. केसांच्या सौंदर्यासाठी आणि आरोग्यासाठी केस विंचरण्याकडे बारकाईने लक्ष द्यायला हवे. कारण कंगवाने आपण केस विंचरतो. कंगवा आपल्या केसांच्या मुळापर्यंत जातो. त्यामुळे आपण कोणता कंगवा किंवा ब्रश वापरावा याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचे  आहे(How To Clean Different Types Of Hair Combs - The Right Way)

साधारणपणे केस विंचरण्यासाठी नायलॉन, प्लास्टिक किंवा लाकडी घटकांपासून तयार झालेले कंगवे आपण वापरतो. केसांच्या आरोग्यासाठी चांगला कंगवा वापरणे जितके महत्वाचे असते, तितकेच कंगव्याची स्वच्छता ठेवणे (How to Clean a Comb) देखील आवश्यक आहे. जर कंगवा अस्वच्छ असेल तर केसगळती, केसात कोंडा होणे, स्कॅल्प च्या त्वचेला इजा होणे यांसारख्या अनेक केसांच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे वेळच्या वेळी तेलकट किंवा अस्वच्छ झालेले कंगवे स्वच्छ करून घ्यावेत. काहीवेळा तेलकट झालेले कंगवे (How to clean comb in one easy step) कितीही धुतले तरीही त्यावरील तेलकटपणा जात नाही. अशावेळी सोपी - झटपट ट्रिक वापरुन आपण हे तेलकट कंगवे काही मिनिटांतच स्वच्छ करु शकतो(Follow This 1 Easy Tips To Clean Comb).

तेलकट कंगवे झटपट स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक... 

१. तेलकट कंगवे स्वच्छ करण्यासाठी सर्वप्रथम संपूर्ण कंगव्यावर रोजच्या वापरातील टॅल्कम पावडर भुरभुरवून घ्यावी. 

२. कंगव्यावर पावडर भुरभुरवून घेतल्यानंतर एका जुन्या टूथब्रशच्या मदतीने हे तेलकट कंगवे घासून घ्यावे. 

देवघरातली पांढरीशुभ्र गोष्ट फार मोलाची, डोक्याला लावा केसातला कोंडा होईल काही दिवसांत गायब...

काळेभोर केस हवे ? तुळशीचा करा 'असा' वापर, केस होतील मऊ मुलायम सुंदर...

३. हे कंगवे ब्रशने घासून घेतल्यानंतर ही पावडर कंगव्यावरील अतिरिक्त तेल शोषून घेते. 

४. आता कंगवे एका टिश्यू पेपरने स्वच्छ पुसून घेऊन मग पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत.

बिया इतक्या छोट्या पण केसांच्या सौंदर्यात पडेल भर...आता घरीच बनवा केसांसाठी होममेड नैसर्गिक कंडिशनर !!

अशाप्रकारे आपण तेलकट झालेले कंगवे साबण आणि पाण्याचा वापर न करता देखील अगदी झटपट स्वच्छ करु शकतो.

Web Title: Follow This 1 Easy Tips To Clean Comb.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.