तवे, कढई, कुकर अशा गोष्टी आपण वर्षानुवर्षे वापरत असतो. पण पुर्वी नॉनस्टिक हा प्रकार नव्हता. त्यामुळे लाेखंडाचे तवे, ॲल्यूमिनियमच्या कढई आणि कुकर वर्षानुवर्षे वापरलं तरी ते आरोग्यासाठी हानिकारक नसायचं. पण आता मात्र आपल्या घरातल्या लोखंडी तवा, कढईची जागा चकचकीत नॉनस्टिक पॅन, कढईने (non stick pan kadhai) घेतली आहे. त्याच्याही बाबतीत आपण तोच आपला जुना वर्षानुवर्षे वापरण्याचा नियम लावतो आहे. पण हे मात्र आरोग्यासाठी अतिशय धोकादायक असल्याचं एका डॉक्टरांनी सांगितलेलं आहे.(you should not use non stick pan having scratches)
याविषयीचा एक छोटासा व्हिडिओ एका डॉक्टरांनी doctor.sethi या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. त्यामध्ये ते डॉक्टर सांगत आहेत की तुम्हीही जर जुने, स्क्रॅचेस पडलेले, रंग उडून भुरकट झालेले नॉनस्टिक पॅन, कढई वापरत असाल तर ते त्वरीत थांबवा आणि असे कढई- तवे तुमच्या घरातून थेट हद्दपार करून टाका.
डाएट- व्यायाम नेहमी करूनही वजन अचानकच वाढायला लागतं? त्याची ६ कारणं, बघा 'असे' होते का?
कारण ते तब्येतीसाठी खूप जास्त हानिकारक आहे. कारण नॉनस्टिक भांडे जेव्हा भुरकट होतात, तेव्हा त्याच्यावरून त्याचं कोटिंग निघून जाण्यास सुरुवात झालेली असते. तुम्ही ही भांडी जेव्हा स्वयंपाकासाठी वापरता, तेव्हा उष्णतेमुळे ते कोटिंग आणखी जास्त प्रमाणात निघून जाऊ लागतं. त्याचे काही लहानसे कण त्यात शिजवलेल्या अन्न पदार्थात मिसळू लागतात. हे कण जेव्हा आपल्या पोटात जातात, तेव्हा ते अनेक आजारांना निमंत्रण देतात.
भुरकट झालेल्या नॉनस्टिक भांड्यात अन्न शिजवल्यास
रंग उडालेल्या नॉनस्टिक पॅनमधील अन्न खाल्ल्यास पुढील आजार होऊ शकतात....
१. पचनाच्या समस्या
झाडांसाठी घरीच तयार करा १ खास औषध, रोपांवर कोणताच रोग पडणार नाही- झाडे वाढतीलही जोमात
२. हार्मोन्सच्या असंतुलनामुळे होणारे वेगवेगळे आजार
३. वंध्यत्व
४. कॅन्सर होण्याची शक्यता बळावते.
५. पोटाचे विकार