Lokmat Sakhi >Social Viral > आजारी असताना बायकोला काम करायला सांगणं हे क्रौर्यच, उच्च न्यायालयाचं मत, संसार दोघांचा तर..

आजारी असताना बायकोला काम करायला सांगणं हे क्रौर्यच, उच्च न्यायालयाचं मत, संसार दोघांचा तर..

Forcing wife to do daily chores cruelty, says Delhi high court : घटस्फोटाच्या खटल्यात निकाल देताना न्यायालय म्हणते, घरकामात सहभाग म्हणजे मोलकरीण नाही- पण जबरदस्ती योग्य नव्हे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2024 02:06 PM2024-03-21T14:06:35+5:302024-03-21T14:19:40+5:30

Forcing wife to do daily chores cruelty, says Delhi high court : घटस्फोटाच्या खटल्यात निकाल देताना न्यायालय म्हणते, घरकामात सहभाग म्हणजे मोलकरीण नाही- पण जबरदस्ती योग्य नव्हे.

Forcing wife to do daily chores cruelty, says Delhi high court | आजारी असताना बायकोला काम करायला सांगणं हे क्रौर्यच, उच्च न्यायालयाचं मत, संसार दोघांचा तर..

आजारी असताना बायकोला काम करायला सांगणं हे क्रौर्यच, उच्च न्यायालयाचं मत, संसार दोघांचा तर..

संसाराचा गाडा हाकण्यासाठी २ चाकांची गरज असते. एक म्हणजे बायको आणि दुसरा म्हणजे नवरा. या दोन चाकांमुळे संसाराची गाडी न थांबता आपला पल्ला गाठत जाते. पूर्वी भारतात नवरा आर्थिक बाजू आणि बायको घराची बाजू सांभाळत असे. दोघांचे एकेमेकांशिवाय पानही हलत नाही, एवढं मात्र खरं. महिलांकडून घरामध्ये केली जाणारी दैनंदिन कामं ही त्यांची कुटुंबाप्रती असणारी ओढ आणि प्रेम दर्शवते (Relationship).

पण, जर एखाद्या महिलेवर प्रकृती अस्वास्थ्यादरम्यानही घरातील कामं करण्यासाठीचा दबाव टाकला जातो. तेव्हा मात्र, ही क्रूरता ठरते असं स्पष्ट मत दिल्लीउच्च न्यायालयानं मांडलं आहे(Forcing wife to do daily chores cruelty, says Delhi high court).

खरंतर हे मत दिल्लीउच्च न्यायालयाने घटस्फोटाच्या एका याचिकेवर सुनावणी करताना दिलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पतीने त्याच्या पत्नीकडून घरातील कामं करण्याची अपेक्षा करण्याला क्रूरता म्हणता येणार नाही. तसेच महिलेला घरातील काम करण्यास सांगितलं तर त्याचा अर्थ असा होत नाही की, ती घराची मोलकरीण आहे. बऱ्याच घरात पती घराच्या आर्थिक जबाबदाऱ्या उचलतात. तर पत्नी घराची बाजू सांभाळते. घटस्फोटाची मागणी करणाऱ्या एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि न्यायमूर्ती नीना बंसल यांच्या खंडपीठाने हे वक्तव्य केलं आहे.

१०१ वर्षांच्या आजीबाई सांगतात भरपूर आणि आनंदी जगायचं तर फक्त ३ सोप्या गोष्टी करा..

नक्की प्रकरण काय? दिल्ली उच्च न्यायालयानं असं मत का मांडलं?

घरातील कामांना क्रूरता म्हणत एका महिलेने तिच्या पतीकडे घटस्फोटाची मागणी केली होती. परंतु, कौटुंबिक न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. त्यानंतर पत्नीचा पतीबरोबर असलेला व्यवहार चुकीचा आहे, असं म्हणत उच्च न्यायालयाने पतीच्या मागणीवर घटस्फोट मंजूर केला. या जोडप्याचं २००७ मध्ये लग्न झालं होतं. शिवाय या जोडप्याला १७ वर्षाचा एक मुलगा देखील आहे.

पाठांतर करुनही मुलं वाचलेलं विसरतात? ४ टिप्स, अभ्यास राहील नीट लक्षात

२०२२ मध्ये पतीने घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. पत्नीकडून आपल्याला आणि आपल्या कुटुंबीयांना सन्मानाची वागणूक मिळत नव्हती. तसेच तिने बिनबुडाचे आरोपही केले. विवाहबाह्य प्रेमप्रकरण असल्याचा पत्नीने पतीवर आरोप केला होता. शिवाय पती व त्याच्या कुटुंबीयांविरोधात पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. ही सगळी बाजू पाहता न्यायालयानं पतीच्या बाजूनं निकाल देत त्याच्या घटस्फोटाच्या मागणीवर शिक्कामोर्तब केला.

Web Title: Forcing wife to do daily chores cruelty, says Delhi high court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.