Join us  

सासूबाईंसोबत शेतात कांदे लावतेय फॉरिनची सुनबाई.. शेतात काम करणाऱ्या सासू- सुनेचा व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2022 5:31 PM

Viral Video of a Foreigner Daughter-in-law: इथे शहरात राहणाऱ्या मुली खेडेगावात जाऊन शेतात काम करायला नाही म्हणतात.. आणि त्याच वेळी ही जर्मनीची (Germany) तरुणी बघा कशी सराईतपणे शेतात काम करतेय.

ठळक मुद्देपंजाबी ड्रेस, कपाळावर टिकली, सिंधूर, गळ्यात मंगळसूत्र अशा भारतीय वेशभुषेत दिसणाऱ्या ज्युलीने नेटिझन्सची मने जिंकून घेतली आहे.

परदेशी लोकांचं वागणं, त्यांचं चालणं- बोलणं, लाईफस्टाईल, खाद्यपदार्थ यांची भुरळ जशी आपल्याकडच्या लोकांना पडलेली असते, तशाच आपल्या काही गोष्टीही तिथल्या लोकांना प्रचंड आवडतात. ही फॉरेनहून आलेली सुनबाईही त्याच प्रकारातली आहे. तिला म्हणे भारतीय लोक, इथली एकत्र कुटूंबपद्धती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खेडेगावातलं शांत, निसर्गाच्या सान्निध्यातलं वास्तव्य तिला अतिशय प्रिय आहे. म्हणूनच तर सध्या सोशल मिडियावर व्हायरल (Viral Video of a Foreigner Daughter-in-law Working in a Farm)झाली आहे या परदेशी सुनबाईंची न्यारीच गोष्ट..

 

namastejuli या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये जी परदेशी तरुणी दिसतेय तिचं नाव ज्युली (July Sharma) असून ती मुळची जर्मनीची आहे. तिने अर्जून शर्मा या भारतीय तरुणाशी विवाह केला आहे आणि मागच्या एका महिन्यापासून ती तिच्या सासरी म्हणजेच भारतातल्या एका खेडेगावात राहते आहे.

हे काय भलतंच? जिलेबीवर ओतली बटाट्याची गरमागरम भाजी.. पाहा जिलेबी- भाजीचा व्हिडिओ व्हायरल

या व्हिडिओमध्ये ती शेतात काहीतरी काम करताना दिसते आहे. तिच्यापासून दूर काही अंतरावर तिच्या सासूबाईही आहेत. या व्हिडिओमध्ये तिला काय करतेस असं विचारल्यावर ती सासुबाईसोबत कांदे (German woman planting onion) लावते आहे, असं सांगते.

 

ज्युलीची हिंदी भाषा अतिशय शुद्ध असून तिच्या बोलण्यात कुठेही इंग्रजी हेल आलेला नाही, हे विशेष. यावरूनच असं वाटतं की ती मागच्या अनेक वर्षांपासून हिंदी बोलण्याचा सराव करत असावी.

हिवाळ्यात केस कोरडे झाल्याने फाटे फुटण्याचं प्रमाण वाढतं.. ५ उपाय, स्प्लिट हेअरचा त्रास कमी

पंजाबी ड्रेस, कपाळावर टिकली, सिंधूर, गळ्यात मंगळसूत्र अशा भारतीय वेशभुषेत दिसणाऱ्या ज्युलीने नेटिझन्सची मने जिंकून घेतली आहे. खेडेगावातलं हे साधं- सोपं आयुष्य आपण मनापासून एन्जॉय करत आहोत, असंही तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलजर्मनीभारत