आता काही दिवसात वाजत गाजत आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होईल. प्रत्येक घरात त्यांच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु आहे. प्रत्येक जण घराची साफसफाई करण्यात व्यस्त आहे. घराची साफसफाई करताना किचन साफ करण्यात गृहिणीचा अधिक वेळ जातो. त्यात फ्रिज साफ करण्यात मेहनत तर लागतेच, सोबत वेळेवर हे काम पूर्ण होत नाही. फ्रिज साफ करताना बाहेरून तर आपण चकाचक साफ करतो, पण आतून फ्रिजचे कप्पे साफ करताना नाकीनऊ येतात. व फ्रिजच्या डोअरवर लावलेला रबरही लवकर साफ होत नाही.
फ्रिज अधिक काळ साफ न केल्यामुळे त्यातून दुर्गंधी पसरते. यासह डोअरवरील रबर काळपट पडू लागतो. फ्रिजच्या डोअरवरील रबर मेहनत न घेता लवकर साफ करायचं असेल तर, या ३ गोष्टींचा वापर करून पाहा. काही मिनिटात फ्रिज चकाचक स्वच्छ होईल(Fridge Door Rubber Is Dirty? Clean like this in minutes).
अशा पद्धतीने बाहेर काढा फ्रिजच्या डोअरवरील रबर
फ्रिजच्या डोअरवरील रबर साफ करणं गरजेचं आहे. कारण यात झुरळं देखील लपलेले असतात. यासाठी फ्रिजचा दरवाजा घट्ट पकडून ठेवा. नंतर एका कोपऱ्यातून रबर पकडून बाहेर काढा. अशा पद्धतीने फ्रिजचा रबर काही मिनिटात सहज निघेल.
बेकिंग सोड्याने स्वच्छ करा फ्रिजच्या डोअरवरील रबर
बेकिंग सोड्याचा वापर फक्त जेवण करण्यासाठी नसून, फ्रिजच्या डोअरवरील रबर स्वच्छ करण्यासाठीही होऊ शकतो. यासाठी एक कप पाण्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा मिक्स करून पेस्ट तयार करा. व ही तयार पेस्ट फ्रिजच्या डोअरवरील रबरवर लावून ठेवा. १५ मिनिटानंतर ब्रशने रबर घासून काढा. घासल्यानंतर रबर पाण्याने स्वच्छ करा. सुकल्यानंतर रबर पुन्हा फ्रिजच्या डोअरवर बसवा.
व्हिनेगरचा करा असा वापर
फ्रिजच्या डोअरवरील रबर स्वच्छ करण्यासाठी आपण व्हिनेगरचा वापर करू शकता. अधिक काळ फ्रिज साफ न केल्यामुळे डोअरवरील रबर चिकट, कळकट होते. साफ करण्यासाठी एका वाटीत पाणी घ्या, त्यात समप्रमाणात व्हिनेगर मिसळा. नंतर कापड किंवा ब्रशच्या मदतीने तयार लिक्विड घेऊन रबर स्वच्छ करा.
काय सांगता! एकाच दिवशी संपूर्ण फॅमिलीचा बर्थ डे, आईबाबा आणि जुळ्या मुलांचा एकाच दिवशी वाढदिवस...
डिटर्जंटने स्वच्छ करा फ्रिजचा डोअर
डिटर्जंटच्या मदतीने आपण फ्रिजच्या डोअरवरील रबर स्वच्छ करू शकता. यासाठी एका वाटीत पाणी घ्या, त्यात २ चमचे स्ट्राँग डिटर्जंट पावडर मिक्स करा. व तयार पेस्ट रबरवर लावून ठेवा. १० ते १५ मिनिटानंतर ब्रशने रबर स्वच्छ घासून काढा. जर रबर अधिक चिकट झाला असेल तर, कोमट पाण्याचा वापर करा. ब्रशने घासल्यानंतर रबर ओल्या कापडाने पुसून काढा.