लग्नात पुरूषांना शेरवानी, कुर्ते, धोतर नेसलेलं तुम्ही अनेकदा पाहिलं असेल पण तुम्ही कधी साडी नेसून आलेले पुरूष कधी पाहिले नसतील. सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे या व्हिडिओत दोन माणसं मित्राच्या लग्नाला साडी नेसून पोहोचले आहेत. या दोघांनी प्रत्येकी एक बिंदी घालून भारतीय पोशाख पूर्ण केला. आपल्या मित्रांना अशा पोशाखात पाहिल्यानंतर नवरदेव हसायला लागला. (Friends of desi groom arrive at wedding venue in chicago wearing saree watch video) असा गेटअप तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल.
भारतीय पोशाख करण्यासाठी या दोघांनीही हा डिसेंट लूक केला आणि नेटिझन्सनी या फोटोला पसंती दर्शवली. शिकागो वेडिंग व्हिडीओग्राफरने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. दोन पुरुष त्यांच्या भारतीय मित्राच्या लग्नासाठी तयार होताना दाखवले. त्यांनी साडीसाठी शेरवानी किंवा कुर्ता घालणं टाळलं. अगदी आउट-ऑफ-द-बॉक्स निवड आपण म्हणायलाच हवी, परंतु प्रत्येकाला ती आवडली.
८ वर्षांच्या प्रयत्नानंतर पठ्ठ्याला Google मध्ये नोकरी मिळाली; कुटुंबियांनी अशी काही रिएक्शन दिली
व्हिडिओमध्ये एक महिला मुलांना साडी नेसण्यास मदत करत असल्याचं आपण पाहू शकता. तयार झाल्यावर ते लोक लग्नाच्या ठिकाणी निघाले. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “ साडी नेसून आलेल्या मित्रांची वरांसोबतसर्वोत्कृष्ट सकाळ. या व्हिडिओला आतापर्यंत २० हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.