'कोशिश करो मेहनत जरूर रंग लायेगी' ही म्हण आपण नक्कीच ऐकलीच असेल (Inspirational Story). यशाच्या मार्गावर अनेक अपयश येतात (Beggar to Doctor). पण खचून न जाता, जो व्यक्ती अपयशाला सामना करतो, त्याच्याच पदरी यश येतं. अशीच एक गरीब मुलगी जी लहानपणी भिक मागून उदरनिर्वाह करायची आज ती अथक परिश्रम घेऊन डॉक्टर बनली आहे. तिचा जीवनप्रवास कसा होता. हालाखीच्या दिवसातील चटके सोसत तिने कशा पद्धतीने मजल मारली. पाहूयात(From seeking alms to prescribing balms: Journey of a child beggar from HP who became doctor).
भिक मागून उदरनिर्वाह ते डॉक्टर बनण्याचं स्वप्न पूर्ण
रिपब्लिक या वेबसाईटनुसार, पिंकी हरियान असं डॉक्टर महिलेचं नाव. हिमाचल प्रदेशच्या मॅक्लॉडगंजमधील भगवान बुद्धाच्या धर्मशाळेत, पिंकी व तिची आई भिक मागून उदरनिर्वाह करत असे. लहानपणापासूनच तिच्या वाटेला दारिद्र्य आलं होतं. परंतु, भिक्षू जामयांग यांनी तिची मदत केली. त्यांनी आजतागायत अनेक गरजू आणि कचरा वेचणाऱ्या मुलांची मदत केली. याच प्रकारे त्यांनी पिंकीचं स्वप्न साकार करण्यास हातभार लावला.
आई-वडिलांसोबत झोपडपट्टीत राहत होती पिंकी
पिंकी हरियान म्हणते, "मला डॉक्टर बनून खूप आनंद झाला आहे. मला माझ्या नावासमोर 'डॉक्टर' लावायला आवडते." हालाखीतील दिवसांची आठवण काढत पिंकी म्हणते, '२००४ साली जेव्हा मी साडेचार वर्षांची होती. तेव्हा मी आणि माझी आई बुद्ध मंदिराजवळ भीक मागून पोट भरत असे. यावेळी भिक्षू जामयांग यांची नजर माझ्यावर पडली. तेव्हा ते माझा शोध घेत मी राहत असलेल्या झोपडपट्टीत पोहचले.
गरबा - दांडिया खेळताना घामाने मेकअप पूर्ण जातो? लक्षात ठेवा १ टीप; मेकअप टिकेल रात्रभर
त्यानंतर माझ्या वडिलांनी त्यांना टोंगलेन चॅरिटेबल ट्रस्टच्या वसतिगृहात नेऊन मला शिक्षण देण्याची विंनती केली. या हॉस्टेलमध्ये बरेच अशी मुलं होतीत ज्याचं पोट भिक मागूनच भरत असे. माझे वडीलही बूट पॉलिश करून घरात २ पैसे आणत होते. पण त्यावर माझं शिक्षण होणं अशक्य होतं.' हरियान यांनी पीटीआयला सांगितले.
लहानपणापासूनच डॉक्टर बनायचे होते स्वप्न
पिंकी सांगते, "मी टोंगलेन चॅरिटेबल ट्रस्टच्या वसतिगृहात प्रवेश घेतलेल्या मुलांच्या पहिल्या तुकडीत होते. मला सुरुवातीला खूप रडायला यायचं. आई - वडिलांची आठवण यायची. पण हळूहळू इतर मुलांसोबत मिसळत गेले. त्यानंतर मला दयानंद मॉडेल स्कूलमध्ये दाखल करण्यात आले. शाळेत असताना मला, 'मोठी झाल्यावर कोणत्या क्षेत्रात करिअर करायला आवडेल असा प्रश्न विचारला' तेव्हा मी डॉक्टर. असे उत्तर दिले. आवड जोपासत मी एक दिवस डॉक्टर होईल असं वाटलं नव्हतं.'
कितीही खाल्लं तरी शरीर हाडकुळं? रोज खा ४ पैकी १ पदार्थ; निरोगी वजन वाढवण्यासाठी सोपा उपाय
भिक्षु जामयांग पिंकीबद्दल म्हणतात..
"पिंकी सुरुवातीपासून अभ्यासात चांगली होती. बारावीची परीक्षा उत्तीर्ण होताच तिने NEET परीक्षाही उत्तीर्ण केली. तिला खाजगी महाविद्यालयात प्रवेश मिळू शकला असता, पण फी खूप जास्त होती. त्यामुळे तिला २०१८साली चीनमधील प्रतिष्ठित वैद्यकीय विद्यापीठात प्रवेश मिळाला. ६ वर्षांची एमबीबीएस पदवी पूर्ण केल्यानंतर ती आता धर्मशाळेत परतली आहे.'
आईला भीक मागण्यास केली मनाई
पिंकी म्हणते, "माझ्या वडिलांनी बूट पॉलिशरची नोकरी सोडली आणि आता रस्त्यावर बेडशीट आणि कार्पेट विकतात. माझी आई आता टोंगलेनने झोपडपट्टीतील लहान मुलांसाठी उघडलेल्या शाळेत मुलांची देखभाल करते. मला एक भाऊ आणि बहिण आहे. हे दोघेही टोंगलेन शाळेत शिक्षण घेत आहेत.'
पुढे पिंकी म्हणते, 'आता मला झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांची आणि लोकांची सेवा करायची आहे. एक सक्षम डॉक्टर झाल्यानंतर माझ्या झोपडपट्टीतील समाजाची सेवा करणे ही माझी जबाबदारी आहे.' त्यामुळे जिद्द आणि चिकाटी असल्यावर स्वप्न कोणतेही असो ते पूर्ण करता येते, असं पिंकीच्या हालाखीच्या प्रवासातून निष्पन्न होते.