Join us  

भर बाजारात तरुणी बनवत होती रिल्स, तेवढ्यात झिंगलेला दारुडा आला आणि...व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2022 12:53 PM

Funny Dance Viral Video of Girl Making Reels In The Market : आतापर्यंत ३ लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

ठळक मुद्देयूट्यूबवरची रेसीपी आणि खरी बनवलेली रेसीपी यामध्ये जे अंतर असतं तेच या दोन डान्समध्ये आहे अशी एका यूजरने कमेंट केली आहे.७ हजार पेक्षा अधिक नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

रील्स बनवणे हे हल्ली एक फॅड झाले आहे. अगदी घरात असलो किंवा कुठेही बाहेर गेलो तरी कोणत्याही गाण्यावर किंवा म्युझिकवर रील्स बनवून ते इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले जातात. गेल्या काही वर्षात तरुणींना या रील्सने बरेच वेड लावले असून कोणत्याही ठिकाणी रील्स करण्यात त्या मग्न होतात. काहीवेळा हा प्रयोग अतिशय छान होतो पण काही वेळा तो पूर्णपणे फसतो. याचेच एक उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले. एक तरुणी भर मार्केटमध्ये रील्स बनवत असताना अचानक एक दारुडा येऊन तिच्यासोबत नाचायला लागला आणि पुढे काय झाले पाहून आपल्याला हसू आवरणार नाही (Funny Dance Viral Video of Girl Making Reels In The Market).

आजुबाजूला भाज्यांचे, फळांचे स्टॉल असलेल्या मार्केटमध्येच तरुणीने डान्स सुरु केला. दिलबर- दिलबर या प्रसिद्ध गाण्यावर ती डान्स करत होती. त्याचवेळी तिच्या मागे आलेल्या खाकी कपड्यातील व्यक्तीनेही तिच्यासारख्याच स्टेप्स करायला सुरुवात केली. हा व्यक्ती दारुमुळे झिंगलेला असल्याचे आपल्याला त्याच्या स्टेप्सवरुन सहज लक्षात येते. पण आपल्या रीलमध्ये कोणी व्यक्ती येऊन नाचत आहे म्हणून कॅमेरा हँडल करणाऱ्या व्यक्तीने शूटींग थांबवले नाही, तर ते तसेच सुरू ठेवले. मग हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. 

हा व्हिडीओ @Chilled_Yogi या ट्विटर हँडवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत ३ लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. या डान्सर मुलीपेक्षा तिच्या मागे नाचणाऱ्या व्यक्तीचीच चर्चा जास्त झाली. आजकाल रोडवरच्या लोकांचीही सहज कंपनी मिळते असे या व्हिडिओला कॅप्शन देताना म्हटले आहे. शिवाय ७ हजार पेक्षा अधिक नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. आतापर्यंत अनेक डान्स पाहिलेत, पण असं टॅलेंट पाहिलं नसल्याचं काही जणांनी कमेंट केलं. लोकांच्यात असलेल्या या टॅलेंटला बाहेर काढण्याची गरज असल्याची गरज आहे अशा एकाहून एक कमेंटस यावर आल्या आहेत. तर यूट्यूबवरची रेसीपी आणि खरी बनवलेली रेसीपी यामध्ये जे अंतर असतं तेच या दोन डान्समध्ये आहे अशी एका यूजरने कमेंट केली आहे.

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियानृत्य