Lokmat Sakhi >Social Viral > हत्तीच्या पिल्लाला इतकी आवडली एक मॉडेल! लाडात येत छोट्या हत्तीने पाहा काय केले, व्हायरल व्हिडिओ

हत्तीच्या पिल्लाला इतकी आवडली एक मॉडेल! लाडात येत छोट्या हत्तीने पाहा काय केले, व्हायरल व्हिडिओ

Viral Video: मुक्या प्राण्यांशी दोस्ती करा, त्यांच्याशी खेळा, पण त्यांचा मूड बघूनच... नाहीतर त्यांच्याशी खेळणं असं या व्हिडिओमधल्या मॉडेलसारखं महागात पडू शकतं...(model was playing with baby elephant)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2022 12:52 PM2022-06-30T12:52:11+5:302022-06-30T12:52:36+5:30

Viral Video: मुक्या प्राण्यांशी दोस्ती करा, त्यांच्याशी खेळा, पण त्यांचा मूड बघूनच... नाहीतर त्यांच्याशी खेळणं असं या व्हिडिओमधल्या मॉडेलसारखं महागात पडू शकतं...(model was playing with baby elephant)

Funny Video: Baby elephant fell on the model Megan Milan and tore her skirt  | हत्तीच्या पिल्लाला इतकी आवडली एक मॉडेल! लाडात येत छोट्या हत्तीने पाहा काय केले, व्हायरल व्हिडिओ

हत्तीच्या पिल्लाला इतकी आवडली एक मॉडेल! लाडात येत छोट्या हत्तीने पाहा काय केले, व्हायरल व्हिडिओ

Highlightsखेळण्याच्या नादात त्या पिल्लाने तिला जमिनीवर पाडलं, तिने उठण्याचा प्रयत्न केला. पण ती उठली की तो तिला पुन्हा पाडत होता.

कोणत्याही प्राण्याचं पिल्लू खूपच आकर्षक दिसतं. अगदी लहान बाळासारखे निरागस भाव त्याच्या चेहऱ्यावर असतात. त्यामुळेच तर वाघाचा बछडा असो किंवा मग आपल्या गल्लीतल्या एखाद्या साध्या कुत्र्याचं पिल्लू, ते पटकन आपलं लक्ष वेधून घेतात हे नक्की. इथं या व्हिडिओमध्येही या माॅडेलसोबत असंच काहीसं झालं. हत्तीचं एक पिल्लू तिला भारीच आवडलं. ती त्याच्या जवळ गेली, त्याच्याशी खेळू लागली, पण खेळता खेळता मात्र काहीतरी विचित्रच झालं आणि त्यामुळे सोशल मिडियावर (social media) मात्र चांगलाच हशा पिकला आहे... हा व्हिडिओ megan.milan या इन्स्टाग्राम (instagram share) पेजवरून व्हायरल झाला आहे.(viral video of baby elephant)

 

त्याचं झालं असं की मेगान मिलन (Megan Milan) ही मुळची अमेरिकेची प्रसिद्ध मॉडेल नुकतीच थायलंड (Thialand) ट्रिपवर गेली होती. तेथील चियांग माई या अभयारण्यात ती भटकंतीसाठी गेली असता तिथे तिला एक हत्तीचा कळप दिसला. हत्तींना आणखी जवळून पाहण्याची तिची इच्छा झाली. त्यामुळे ती त्यांच्या अधिक जवळ गेली. मॉडेलच ती. त्यामुळे तिने त्यांच्यासोबत फोटोशूटही केलं. त्याच कळपात होतं हत्तीचं एक छोटंसं पिल्लू. हे पिल्लू अवघ्या ३ आठवड्यांचं होतं, असा उल्लेख मेगनने तिच्या पोस्टमध्ये केला आहे. हे पिल्लू तिला भारीच आवडलं. 

 

म्हणून मग तिने त्याच्याशी थोडं फार खेळण्याचा प्रयत्न केला. पिल्लालाही मग उत्साह आला. त्याने देखील तिच्याशी मैत्री केली. खेळता खेळता पिल्लू चांगलंच मस्ती करू लागलं. मेगनच्या मागेमागेच धावू लागलं. त्यादिवशी मेगनने नेमके शॉर्ट टॉप आणि लाँग स्कर्ट असे कपडे घातले होते. खेळण्याच्या नादात त्या पिल्लाने तिला जमिनीवर पाडलं, तिने उठण्याचा प्रयत्न केला. पण ती उठली की तो तिला पुन्हा पाडत होता. शेवटी खेळण्याच्या नादात त्याने बिचारीचा स्कर्टही फाडून टाकला. व्हिडिओ बघताना आता हे पिल्लू तिला काय करणार, अशी भीती आपल्याला वाटते. पण त्या पिल्लाने तिला काहीही इजा केली नाही, आम्ही फक्त खेळत होतो, असं मेगनने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. 
 

Web Title: Funny Video: Baby elephant fell on the model Megan Milan and tore her skirt 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.