Lokmat Sakhi >Social Viral > भर लग्नात, ऐन मंडपात नवरा- नवरीची मारामारी; एकमेकांना ठेवून दिले सणासण फटके, व्हायरल व्हिडिओ 

भर लग्नात, ऐन मंडपात नवरा- नवरीची मारामारी; एकमेकांना ठेवून दिले सणासण फटके, व्हायरल व्हिडिओ 

Fighting Of Bride And Groom On Stage: या नवरा- नवरीने स्टेजवर जे काही करायला सुरुवात केली, ते पाहून अनेक जणांना हसू आवरणं कठीण झालं आहे. (Funny Video)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2022 01:54 PM2022-08-29T13:54:24+5:302022-08-29T13:55:05+5:30

Fighting Of Bride And Groom On Stage: या नवरा- नवरीने स्टेजवर जे काही करायला सुरुवात केली, ते पाहून अनेक जणांना हसू आवरणं कठीण झालं आहे. (Funny Video)

Funny Video: Bride and groom started beating each other on stage, Must watch their viral video | भर लग्नात, ऐन मंडपात नवरा- नवरीची मारामारी; एकमेकांना ठेवून दिले सणासण फटके, व्हायरल व्हिडिओ 

भर लग्नात, ऐन मंडपात नवरा- नवरीची मारामारी; एकमेकांना ठेवून दिले सणासण फटके, व्हायरल व्हिडिओ 

Highlights पण तो नवरदेव हट्टालाच पेटला.. हाच त्याचा हट्ट त्याला नडला आणि मग पुढचा सगळा किस्सा घडला.

लग्न होऊन नुकतेच काही तास झाले असतील, तोच या नवरा- नवरीने ऐन मंडपात, स्टेजवर (wedding season) सगळ्यांसमोरच जे काही सुरू केलं आणि जो काही गोंधळ घातला, त्यावरून हे दोघे एकमेकांशी कसा बरं संसार करणार? असा प्रश्न उपस्थित वऱ्हाडींना पडला असणार. कारण त्या दोघांनी जे काही केलंय ते खरोखरंच खूपच हास्यास्पद होतं. साधारण कोणतंही लग्न (marriage) लागल्यानंतर असं चित्र दिसतं की नवरा- नवरी एकमेकांशी खूपच प्रेमाने वागत असतात. लाजण्या- बुजण्यातच त्यांचे सुरुवातीचे दिवस जातात. पण इथे तर थेट त्याच्या अगदी उलट चित्र दिसून आलं. (Bride and groom started beating each other on stage)

 

patiale_wale_chacha_ji या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ, सध्या सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नुकतंच लग्न झालेलं एक सर्वसामान्य कुटूंबातलं जोडपं दिसत आहे. दोघेही स्टेजवरच उभे असून दोघंही लग्नाच्याच भरजरी कपड्यांमध्ये आहे. यात नवऱ्याला अचानक काय लहर आली देव जाणे आणि त्याने त्याच्या नवरीला केळ खाण्याचा आग्रह केला. तिला काही केळ खायचं नव्हतं. म्हणून तिने सुरुवातीला त्याला एकदम व्यवस्थित नकार दिला. पण तो नवरदेव हट्टालाच पेटला.. हाच त्याचा हट्ट त्याला नडला आणि मग पुढचा सगळा किस्सा घडला.

 

त्याने बळजबरी नवरीच्या तोंडात केळ कोंबलं. ते पाहून ती चिडली आणि त्याला एक जोरात चापट मारली. नुकतंच लग्न झालेल्या बायकोने आपल्याला मारलं, हे त्याच्या फारच जिव्हारी लागलं

हरितालिकेच्या पुजेसाठी ऐनवेळी धांदल नको, करून ठेवा ६ गोष्टींची तयारी एक दिवस आधीच 

आणि मग त्यानेही तिला दोन- चार धपाटे घातले. यावर ती नवरी शांत थोडीच बसणार होती, ती पण तेवढीच चवताळून त्याच्या अंगावर गेली आणि तिने त्याला आणखी दोन- चार फटके घातले. स्टेजवरच एकमेकांशी मारामारी करणारे हे दोघं पाहून मात्र काही वऱ्हाडींची हसता- हसता पुरेवाट झाली तर काही जणांना त्यांच्या भावी संसाराची काळजी वाटू लागली. 

 

Web Title: Funny Video: Bride and groom started beating each other on stage, Must watch their viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.