Join us  

‘जिंदगीभर पढते- पढते बुढ्ढा हो जाऊंगा!’ रडत रडत आईशी कसं भांडतोय बघा हा चिमुकला, व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2022 2:06 PM

Viral Video Of a Little Boy: लहान मुलांचे व्हिडिओ सोशल मिडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. आता हा आणखी एक लहानगा, जो अभ्यास नको म्हणून त्याच्या आईशी हुज्जत घालतो आहे..

ठळक मुद्देकाही अपवाद वगळता हे चित्र आता बहुतांश घरांमध्ये दिसून येतं. अशाच आशयाचा एक व्हिडिओ सध्या साेशल मिडियावर व्हायरल (social viral) झाला आहे.

लहान मुलांचं आणि त्यांच्या आईचं अभ्यासावरून नेहमीच काही ना काही होत असतं. मुलांनी चटकन अभ्यासाला बसावं, पटकन होमवर्क (home work of children) पुर्ण करून टाकावा, असं आईचं म्हणणं असतं. तर मुलांना मात्र खेळणं सोडून अभ्यासात मुळीच डोकं घालायचं नसतं. त्यामुळे शक्य होईल तितका अभ्यास लांबविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मुलांच्या या सवयीमुळे वैतागलेल्या आईला मग त्यांना बळजबरी अभ्यासाला बसवावंच लागतं. मग मुलांची आईवर आणि आईची मुलांवर चिडचिड सुरू होते. काही अपवाद वगळता हे चित्र आता बहुतांश घरांमध्ये दिसून येतं. अशाच आशयाचा एक व्हिडिओ सध्या साेशल मिडियावर व्हायरल (social viral) झाला आहे.

 

saloni_agarwal17andkaairav_agarwal2018 या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. काही दिवसांपुर्वीच शेअर झालेला हा व्हिडिओ आजपर्यंत लाखो लोकांनी बघितला असून त्याला तब्बल साडेतीन लाखांपेक्षाही जास्त लाईक मिळाले आहेत. या व्हिडिओत जो मुलगा दिसतो आहे तो अंदाजे ५ ते ६ वर्षांचा असावा आणि पुर्व प्राथमिक विभागात शिकत असावा, असं वाटतं. त्या मुलाच्या आईने त्याला अभ्यासाला बसवलं आहे. आणि त्याला मात्र मुळीच अभ्यास करायचा नाहीये. पण आई ऐकतच नाहीये, हे पाहून मग त्या मुलाने अभ्यासाविषयी आणि आईविषयीही नाराजी दाखविण्यासाठी रडायला सुरुवात केली. 

 

"जिंदगीभर पढते- पढते मै आखिर बुढ्ढा हो जाऊंगा..", असं मोठ्या मोठ्याने रडून तो त्याच्या आईला सांगतो आहे. ताे ज्या पद्धतीने हे वाक्य बोलतो, ते ऐकून खरंच हसू आल्याशिवाय राहात नाही.

नऊ दिवसांचे उपवास करताना तज्ज्ञांनी सांगितला खास आहार.. ॲसिडीटी, अपचनाचा त्रास होणार नाही

त्याची आई त्याच्या वरचढ आहे. मुलाची समजून काढताना ती त्याला म्हणतेय की "म्हातारं व्हायचंच आहे तर शिकून- सवरून हो ना.. ऐसा गवार- अनपढ रेहके बुढ्ढा क्यू होना है..." धन्य तो मुलगा आणि धन्य त्याची आई... 

 

टॅग्स :सोशल व्हायरलइन्स्टाग्रामलहान मुलं