लहान मुलांना अभ्यास करण्यासाठी किती मागे लागावं लागतं हे तुम्हाला माहीतच असेल. अभ्यासाची वेळ टाळण्यासाठी वाट्टेल ती कारणं द्यायची मुलांची तयारी असते. बहुतेक मुलं अभ्यासाचं नाव काढताच रडायला सुरूवात करतात. उत्साहात अभ्यासाला बसतील अशी मुलं खूप कमी दिसून येतात. अभ्यासाला नकार देण्याची कारणं आणि मुलांचे त्यावेळचे हावभाव यातही वेगळीच मजा असते. अशावेळी मुलांना लाडानं जवळ घ्यावं की अभ्यास करत नाही म्हणून ओरडावं हेच कळत नाही. (The video of the little girl who is bored with her studies will make you laugh)
सोशल मीडियावर अभ्यासाला वैतागलेल्या एका चिमुरडीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमचं बालपण आठवल्याशिवाय राहणार नाही. तिच्या हावभावांनी नेटिझन्सचं मन जिंकलं आहे. सुरूवातीला ती मुलगी नको बया, अभ्यास करून मला कंटाळा येतोय असं बोली भाषेत म्हणते.
समोरील व्यक्तीनं आई येईपर्यंत तू काय करणार असं विचारल्यानंतर आई येईपर्यंत मी बसून राहणार असं गमतीदार उत्तर ती मुलगी देते. त्यानंतर समोरील महिलेनं तोपर्यंत १ पेज लिहून होईल असं म्हटल्यानंतर चिमुरडी मी तेव्हढचं करणार आणि आपलं आपलं दप्तर भरणार असं म्हणते. या चिमुरडीचे अभ्यासाला नकार देण्याचे हावभाव पाहून नेटिझन्सचा खूप हसत आहे.
‘त्याला’ राष्ट्रीय चमचा जाहीर करा अशी मागणी का करतोय हा तरुण?
लोकांनी या व्हिडिओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. एका युजरनं 'आपल्या लहानपणी आपण पण असंच काहीतरी बोलत असू निरागसपणे, एवढंच की आता हे व्हिडिओ रेकॉर्ड करता येतं' अशी भावनीक कमेंट केली आहे. तर अनेकांनी खूप क्यूट, गोड मुलगी आहे असं म्हटलं आहे.