Lokmat Sakhi >Social Viral > स्वत: नाचतेय आणि चक्क म्हशीलाही नाचायला लावतेय, बघा हा मजेशीर व्हायरल व्हिडिओ

स्वत: नाचतेय आणि चक्क म्हशीलाही नाचायला लावतेय, बघा हा मजेशीर व्हायरल व्हिडिओ

Buffalo Dance: साेशल मिडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही.. आता हा एक असाच मजेशीर व्हिडिओ, त्या महिलेने चक्क एका म्हशीलाच नाचायला लावलं आहे. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2022 05:44 PM2022-09-29T17:44:44+5:302022-09-29T17:46:12+5:30

Buffalo Dance: साेशल मिडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही.. आता हा एक असाच मजेशीर व्हिडिओ, त्या महिलेने चक्क एका म्हशीलाच नाचायला लावलं आहे. 

Funny Viral Video: A women is teaching to buffalo how to dance, Amazing video of dancing buffalo | स्वत: नाचतेय आणि चक्क म्हशीलाही नाचायला लावतेय, बघा हा मजेशीर व्हायरल व्हिडिओ

स्वत: नाचतेय आणि चक्क म्हशीलाही नाचायला लावतेय, बघा हा मजेशीर व्हायरल व्हिडिओ

Highlightsम्हशीचा डान्स पाहून ती महिला, बाजुची मुलं आणि नेटिझन्सही जाम खूश झाले आहेत. म्हणूनच तर एकदा बघितलाच पाहिजे म्हशीने केलेला हा तुफान डान्स. 

काही प्राण्यांचे किंवा काही मुलांचे व्हिडिओ सोशल मिडियावर (social media) जबरदस्त व्हायरल होत असतात. कारण ते व्हिडिओ खरोखरच अतिशय मजेशीर असतात आणि ते पाहिल्यावर बघणाऱ्याचे काही काळासाठी तरी मनोरंजन होते. आता असाच एक हलका- फुलका आणि अगदी गमतीदार व्हिडिओ सोशल मिडियावर गाजतो आहे. यामध्ये एक महिला तर नाचतेच आहे, पण तिने नाचता नाचता चक्क तिच्या म्हशीलाच डान्स (viral dance video of Buffalo Dance) शिकवला आहे. त्यामुळे त्या महिलेच्या तालावर ही म्हैस कशी नाचतेय, हे खरोखरच बघण्यासारखं आहे. 

 

videonation.teb या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला दिसतेय आणि तिच्यासमोर दोन म्हशी आहेत. महिलेच्या वेशभुषेवरून तर ती पंजाब, हरियाणा किंवा मग उत्तरेकडच्या एखाद्या राज्यातील असावी असे वाटते. या महिलेला डान्स करण्याची मोठीच आवड दिसते. तिच्या आजुबाजुला काही लहान मुलंही आहेत, आणि ते सगळेही या महिलेसोबत म्हशीचा डान्स एन्जॉय करत आहेत. या व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की ती महिला स्वत:च एक गाणं म्हणते आहे आणि टाळ्या वाजवत नाचते आहे.

 

अगदी उत्साहात नाचत- नाचत तिने एक- दोन स्टेप केल्या आणि त्यानंतर नाच ना.... असं म्हणून चक्क म्हशीलाही नाचायला लावलं. त्या महिलेची आणि म्हशीची अशा प्रकारची डान्स प्रॅक्टिस रोजच चालते, असं वाटतं. कारण महिलेने डान्स संपवून म्हशीला नाचायची सुचना दिली आणि म्हशीनेही ती त्वरीत फॉलो करत पाय उचलून मोठ्या दणक्यात डान्स केला. म्हशीचा डान्स पाहून ती महिला, बाजुची मुलं आणि नेटिझन्सही जाम खूश झाले आहेत. म्हणूनच तर एकदा बघितलाच पाहिजे म्हशीने केलेला हा तुफान डान्स. 

 

Web Title: Funny Viral Video: A women is teaching to buffalo how to dance, Amazing video of dancing buffalo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.