आवडती गाणी ऐकत (listening music) मस्त निवांत डोळे मिटून पडून राहणं, हा अनेकांचा आवडीचा छंद. सुटीच्या दिवसातला एक तास तरी अनेक जण अशाच पद्धतीने घालवतात. तुम्हालाही असा छंद असेल आणि त्यासाठी तुम्ही बागेत, अंगणात, गच्चीवर मस्त कानात इयर बड्स (earbuds) घालून गाणी ऐकत असाल, तर तुमच्यासोबतही असा मजेशीर किस्सा घडू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ एकदा बघा आणि मग डोळे मिटून गाणी ऐकताना आवश्यक ती खबरदारी घ्या.
हा गंमतशीर व्हिडिओ reddit द्वारे शेअर करण्यात आलेला आहे. ही तरुणी नेमकी कोणत्या देशातली आहे, त्याचा अंदाज येत नाहीये. पण व्हिडिओ मात्र जगभर चांगलाच बघितला जात आहे.
या व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की एक तरुणी बागेमध्ये लॉनवर झोपली आहे. आणि तिच्या कानात इअर बड्स असून ती निवांत गाणी ऐकते आहे. गाणी ऐकण्यात ती अगदी दंग झाल्याने शिवाय कानात गाणी वाजत असल्याने तिला आजूबाजूचे आवाज ऐकू येत नसावेत. अशातच एक पक्षी तिच्याजवळ येतो. आणि चोचीने अलगदपणे तिच्या एका कानातले इअर बड्स काढून उडून जातो.
ती त्या पक्ष्याला थांबविण्याचा त्याच्याकडून ते इअर बड्स सोडविण्याचा भरपूर प्रयत्न करते. पण ती जवळ गेली की पक्षी लांब उडून जातो. काही तिला दाद देतच नाही. शेवटी ती त्याला केळी पण देते.
अभिनेत्री यामी गौतमने केला बनाना केक, लाडक्या भाच्यासाठी तिने केलेल्या केकची बघा खास रेसिपी
केळी खाण्याच्या निमित्ताने तरी तो चोच उघडेल आणि इअर बड्स सोडेल, असं तिला वाटतं. पण त्या पक्ष्याला ते इअर बड्स एवढे आवडले की त्याच्यापुढे केळी खायलाही त्याने नकार दिला.