Lokmat Sakhi >Social Viral > धमाल व्हिडिओ : पाण्यात स्कूटी बंद पडली तरी गर्लफ्रेंड गाडीवरुन उतरायलाच तयार नाही, मग बॉयफ्रेंडने...

धमाल व्हिडिओ : पाण्यात स्कूटी बंद पडली तरी गर्लफ्रेंड गाडीवरुन उतरायलाच तयार नाही, मग बॉयफ्रेंडने...

Funny Video: गर्लफ्रेंड ऐकायलाच तयार नाही, म्हणून मग शेवटी बघा त्या बिचाऱ्याला काय करावं लागलं... हा व्हिडिओ पाहून अनेकांची हसून हसून पुरेवाट झाली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2022 01:18 PM2022-09-17T13:18:52+5:302022-09-17T13:19:35+5:30

Funny Video: गर्लफ्रेंड ऐकायलाच तयार नाही, म्हणून मग शेवटी बघा त्या बिचाऱ्याला काय करावं लागलं... हा व्हिडिओ पाहून अनेकांची हसून हसून पुरेवाट झाली आहे.

Funny viral video of a girlfriend who is not ready to get off the scooty | धमाल व्हिडिओ : पाण्यात स्कूटी बंद पडली तरी गर्लफ्रेंड गाडीवरुन उतरायलाच तयार नाही, मग बॉयफ्रेंडने...

धमाल व्हिडिओ : पाण्यात स्कूटी बंद पडली तरी गर्लफ्रेंड गाडीवरुन उतरायलाच तयार नाही, मग बॉयफ्रेंडने...

Highlightsतिचा बॉयफ्रेंड एवढ्या अडचणीत आहे, तरी या मॅडम समजून घ्यायला तयारच नाहीत. म्हणूनच मग बघा वैतागलेल्या बॉयफ्रेंडने नेमकं काय केलं

गर्लफ्रेंड आणि तिचे नखरे हा सोशल मिडियावर नेहमीच एक चर्चेचा आणि विनोदाचा भाग असतो. अर्थात सगळ्या जणीच तशा असतात, असं काही नाही. पण व्यक्ती तितक्या प्रवृत्ती यानुसार प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आणि वागणंही वेगवेगळं. सध्या अशाच एका नखरेल गर्लफ्रेंडची (girlfriend) सोशल मिडियावर चर्चा सुरू आहे. तिचा बॉयफ्रेंड (boyfriend) एवढ्या अडचणीत आहे, तरी या मॅडम समजून घ्यायला तयारच नाहीत. म्हणूनच मग बघा वैतागलेल्या बॉयफ्रेंडने नेमकं काय केलं (girlfriend is not getting off the scooty).. 

 

thebackbencherrs या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अतिशय मजेदार असणाऱ्या या व्हिडिओला लाखो लाईक्स आले आहेत. भारतातल्याच कोणत्यातरी शहरातला हा व्हिडिओ. शहराचं नाव नेमकं कळत नाहीये. पण मुसळधार पाऊस होऊन गेल्याने रस्त्यावर भरपूर पाणी साचलं आहे. या पाण्यात एका तरुणाची दुचाकी फसली आहे आणि ती बंद पडली आहे. त्याची मैत्रीणही त्याच्यासोबतच आहे. पण खाली पाणी असल्याने या मॅडम काही गाडीवरून उतरायला तयार नाहीत. तो बिचारा गाडीची किक मारून मारून परेशान आहे. पण गाडी काही सुरू होईना आणि मैत्रिण काही खाली उतरेना.

 

शेवटी मग बिचारा थकून गेला. आणि त्याच नादात त्याचा गाडीवरचा ताबाही सुटला. मग काय गाडी पडली आणि गाडीवर बसलेली त्याची गर्लफ्रेंड धाडकन पाण्यात कोसळली.

जेनेलियाच्या नाकातली सुंदर नथ! दसरा दिवाळीला हवाच असा नथीचा खास नखरा

गाडी आणि आपली मैत्रीण दोघीही पाण्यात पडलेल्या हा मुलगा पाहात होता. पण तरीही त्यांना उचलण्यासाठी तो काहीही धडपड करत नव्हता. त्याचा तो थंडपणा बघूनच त्याने गर्लफ्रेंडला धडा शिकविण्यासाठी मुद्दाम गाडीवरचा कंट्रोल सोडला, असंही काही नेटीझन्स म्हणत आहेत. एकंदरीतच हा व्हिडिओ अतिशय विनोदी आहे.   

 

Web Title: Funny viral video of a girlfriend who is not ready to get off the scooty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.