आपल्याला माहितीच आहे की सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. आता घरात एखादं लग्न ठरलं की घरातल्या सगळ्याच सदस्यांचा उत्साह अगदी शिगेला पोहोचलेला असतो. फक्त घरातलेच लोक नाही तर इतर नातेवाईक, मित्रमंडळी, ऑफिसमधले सहकारी, काॅलनीमधले लोक असे सगळेच भलतेच उत्साहात असतात. त्या उत्साहाच्या भरात मग काही रंजक, मजेशीर गोष्टीही घडतात. अशीच एक खूपच हसायला लावणारी घटना नुकतीच घडली असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे. वऱ्हाडी मंडळी नाचत पुढे कार्यालयात गेले आणि नवरदेव मात्र बिचारा मागेच ट्रॅफिकमध्ये अडकला (wedding barat went ahead and the poor groom stuck in the traffic) असा तो विनोदी व्हिडिओ असून एकदा नक्कीच पाहायला हवा..(Funny Viral Video)
shourrya23 या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ते शहर नेमकं कोणतं याचा अंदाज येत नाही. पण त्यामध्ये असं दिसत आहे की सायंकाळची अगदी गर्दीची वेळ असून लग्नाची वरात शहरातल्या मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरून जात आहे.
डबलबेडचे जयपुरी कॉटन बेडशीट फक्त ४९९ रुपयांत, धमाकेदार ऑफरमध्ये करा स्वस्तात मस्त खरेदी
दुरवर असणाऱ्या वरातीमुळे परीसरातील ट्रॅफिक जाम झाली असून तो नवरदेव त्याच ट्रॅफिकमध्ये अडकलेला आहे. पण त्याचे एक दोन मित्र सोडले तर बाकी वऱ्हाडी मंडळींना आपण ज्याच्यासाठी नाचतो आहोत किंवा ज्याच्या लग्नाला आलेलो आहोत त्याच नवरदेवाला मागे साेडून आपण नाचत आहोत याचा पत्ताही नाही. वरात नाचत नाचत खूप पुढे गेली आहे आणि नवरदेव मात्र ट्रॅफिकमधून वाट काढून वरातीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे.
स्टनिंग लूक देणारे ७ डिप नेक ब्लाऊज डिझाईन्स! साडी साधी असूनही दिसाल एकदम स्टायलिश
पण एवढं होऊनही नवरदेव अजिबात वैतागलेला किंवा वऱ्हाडी मंडळींवर चिडलेला नाही. उलट तो खूपच जास्त कुल असून हसून या सगळ्या परिस्थितीचा आनंद घेत आहे.
अभ्यासाला बसताच खूप झोप येते? ७ गोष्टी करा- झोप पळून जाईल आणि भरपूर अभ्यास होईल
'जास्त उशीर केलास तर तुला इथेच ठेवून जाऊ' अशी धमकी आजपर्यंत आपल्या सगळ्यांनाच घरच्यांनी कधी ना कधी दिलेली असते.. आज हीच धमकी या नवरदेवाच्या बाबतीत घरच्यांनी खरी करून दाखवली असं एकाने कमेंटमध्ये म्हटलं आहे..