Lokmat Sakhi >Social Viral > अशी लढवली शक्कल! ‘त्यानं’ ट्रेडमिलवर जोरात धावावं म्हणून पाहा ‘तिनं’ दाखवले काय आमिष? व्हायरल व्हिडिओ

अशी लढवली शक्कल! ‘त्यानं’ ट्रेडमिलवर जोरात धावावं म्हणून पाहा ‘तिनं’ दाखवले काय आमिष? व्हायरल व्हिडिओ

Viral Video: त्यानं व्यायाम करावा, जोरात पळावं, यासाठी बघा त्याच्यासमोर उभी असणारी ती त्याला कशा पद्धतीने अमिष दाखवते आहे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2022 04:42 PM2022-09-23T16:42:28+5:302022-09-23T16:43:12+5:30

Viral Video: त्यानं व्यायाम करावा, जोरात पळावं, यासाठी बघा त्याच्यासमोर उभी असणारी ती त्याला कशा पद्धतीने अमिष दाखवते आहे...

Funny Viral Video: Woman motivates man to run faster on treadmill by offering him food | अशी लढवली शक्कल! ‘त्यानं’ ट्रेडमिलवर जोरात धावावं म्हणून पाहा ‘तिनं’ दाखवले काय आमिष? व्हायरल व्हिडिओ

अशी लढवली शक्कल! ‘त्यानं’ ट्रेडमिलवर जोरात धावावं म्हणून पाहा ‘तिनं’ दाखवले काय आमिष? व्हायरल व्हिडिओ

Highlightsफिटनेससाठीचं मोटीव्हेशन म्हणून व्यायाम करणाऱ्याला असं काही दिलं जात आहे, की ते पाहूनच नेटिझन्स अचंबित झाले आहेत. 

कोणतंही काम असो, अगदी लहान मुलांचा अभ्यासही का असेना, ते काम केल्यानंतर आपल्या आवडीचं काहीतरी मिळणार आहे, हे जेव्हा लक्षात येतं, तेव्हा ती गोष्ट करण्यासाठी, मिळविण्यासाठी माणूस खूप धडपड करतो. मन लावून त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. नोकरीतही मिळणारा पैसा किंवा पगार हे काम करण्यातलं मोठं समाधान आणि मोटीव्हेशन असतं. पण इथे मात्र मोटिव्हेशन देण्यासाठी आणि ते ही फिटनेससाठीचं मोटीव्हेशन ( Woman motivates man to run faster on treadmill by offering him food) म्हणून व्यायाम करणाऱ्याला असं काही दिलं जात आहे, की ते पाहूनच नेटिझन्स अचंबित झाले आहेत. 

 

हा एक मजेदार व्हिडिओ तुम्ही पहायलाच पाहिजे, असा आहे. jimmylevy या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

..मी कित्ती वाट पाहिली! दादा होणार हे कळल्यावर पहा छोटुशा मुलानं काय केलं... व्हिडिओ व्हायरल..

हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, ते काही समजत नाही. पण व्हिडिओ मात्र अतिशय विनोदी आहे. त्यात असं दिसत आहे की एक जाडजूड व्यक्ती जीममध्ये व्यायाम करून वजन घटविण्याचा प्रयत्न करते आहे. त्यासाठी तो ट्रेडमिलवर धावत आहे. त्या व्यक्तीची तब्येत पाहून वेगवेगळे खाद्यपदार्थ त्याच्या आवडीचे असावेत, तो चांगलाच खवय्या असावा, असं वाटतं. म्हणूनच ट्रेडमिलवर त्याने आणखी जोरात धावावं, यासाठी त्याला चक्क खाद्य पदार्थांचंच अमिष दाखवण्यात आलं आहे. 

 

या व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की ती व्यक्ती एका जीममध्ये असून ट्रेडमिलवर धावते आहे. त्याच्यासमोर एक स्त्री उभी आहे. ती त्याची पत्नी आहे, नातलग आहे की ट्रेनर आहे, हे काही नेमकं समजत नाहीये.

केस सारखे चिपचिपीत होतात? सोपा घरगुती उपाय, केस होतील शायनी- सिल्की

पण तिच्या हातात कोणतातरी खाद्यपदार्थ असून तिने तो उंचावर पकडला आहे. तो माणूस वेगात धावला की ती त्याला तो पदार्थ खाऊ घालते आहे. आता वजन कमी करण्यासाठी एखाद्याला खाद्यपदार्थांचंच अमिष दाखवलं जातंय, हे बघून काही जणांना मात्र हसू आवरेना. 
 

Web Title: Funny Viral Video: Woman motivates man to run faster on treadmill by offering him food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.