गणेशोत्सवाचा (Ganesh Chaturthi) सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. गणपतीच्या दिवसांत दारासमोर रांगोळी काढली असेल तर सौंदर्य अधिकच खुलून दिसंत. गणेशोत्सवाच्या १० दिवसात दारासमोर किंवा देव्हाऱ्यासमोर रांगोळी काढून तुम्ही घराची शोभा वाढवू शकता. (Ganpati Rangoli Designs) दारासमोर काढता येतील अशा सोप्या, साध्या रांगोळ्या पाहूया. जर तुम्हाला रांगोळी काढायला फारसं जमत नसेल तर तुम्ही बांगडी, केसांच्या पीना किंवा ठिपक्यांच्या साहाय्याने रांगोळ्या काढू शकता. या साहित्याचा वापर केल्यास सुबक रांगोळी पटकन काढून होतात. (Ganpati Festival Special Rangoli Designs)
हिंदू धर्मात कोणतंही शुभ कार्य करण्याआधी रांगोळी किंवा तांदूळाच्या पिठाने आकृती साकारली जाते. कोणत्याही शुभ कार्याआधी रांगोळी काढल्यानं सकारात्मक उर्जेचा प्रवाह राहतो याशिवाय नकारात्मक उर्जा दूर होते. हिंदू धर्मात देवी देवतांच्या स्वागतासाठी रांगोळी काढली जाते.
रांगोळी काढण्याबाबत असं मानलं जातं की एक चौक किंवा चित्राांच्या माध्यमातून आपला भाव दर्शवता येतो. याशिवाय रांगोळी एक प्राचीन शब्द आहे. आधीच्या काळात तांदूळाचे पीठ, फूलं, चुना, पिठाचे मिश्रण यापासून रांगोळ्या काढल्या जात असत.
आजकाल इंटरनेटवर वेगवेगळ्या प्रकारच्या डिजाईन्स उपलब्ध आहेत. लक्ष्मीची पाऊलं, स्वास्तिक, गणपती अशा सुंदर एकापेक्षा एक रांगोळी तुम्ही काढू शकता. खडून आधी आकार काढून नंतर मग रांगोळी काढणं सोपं जातं. रांगोळीत जास्वंदाचे फुलसुद्धा शोभून दिसतं.