गणपती बाप्पाच्या आगमनाला आता अवघे २- ३ दिवस राहिलेले आहेत. त्यामुळे मग गणपतीचे मखर कसे करायचे, त्याच्याभोवती कशी सजावट करायची, याची तयारी आता घरोघरी सुरू झालेली आहे. आपल्या घरचं गणपतीचं मखर सगळ्यांपेक्षा वेगळं आणि सुंदर दिसावं, असा प्रत्येकाचाच प्रयत्न असतो (ganpati decoration ideas). पण त्याच्यासाठी नेमकं काय वेगळं करावं हे सुचत नाही (how to decorate ganpati makhar?). म्हणूनच या काही खास टिप्स बघा. गणपतीच्या सजावटीसाठी त्या तुमच्या नक्कीच उपयोगी येतील...(easy and simple tips for ganapati decoration)
गणपतीचे डेकोरेशन कसे करावे?
१. कापडांचा, साडीचा वापर
गणपतीभोवती आरास करण्यासाठी किंवा त्याचं मखर तयार करण्यासाठी तुम्ही साड्यांचा वापर करू शकता.
अंग नेहमीच दुखतं- पायांत गोळे येतात? डॉक्टर सांगतात ४ पदार्थ खा; दुखणं पळेल- ठणठणीत व्हाल
सध्या जवळपास प्रत्येक शहरातल्या बाजारपेठांमध्ये बॅकड्रॉप म्हणून वापरण्यासाठी वेगवेगळे जाळीदार कपडे, मखमली कपडे विकायला आले आहेत. अगदी ३०- ४० रुपये मीटर याप्रमाणे त्याची विक्री होत आहे. असे एकमेकांशी मिळतेजुळते २- ३ रंगांचे कपडे आणले तरी अशा पद्धतीचं सुंदर डेकोरेशन होऊ शकतं...
२. फुलांचा, पानांचा वापर
हल्ली या प्रकारचं डेकोरेशनही बरेच जण करतात. यासाठी मेथी ग्रास म्हणून बाजारात आर्टिफिशियल गवताचा एक खूप सुंदर प्रकार मिळतो.
गुलाबजामच्या उरलेल्या पाकाचं काय करावं? बघा ३ पर्याय- गुलाबजाम एवढेच चवदार पदार्थ तयार
तो मागच्याबाजुला लावून त्यावर झेंडूच्या फुलांच्या माळा सोडल्या की खूप छान सजावट दिसते. बाजारात सजावटीच्या ग्रासचे तसेच फुलांचेही खूप वेगवेगळे प्रकार आले आहेत.
३. अशा पद्धतीची रिंग ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळते. किंवा तुमच्या शहरातल्या सजावटीच्या दुकानातही मिळेल.
परफेक्ट फेस्टिव्ह लूक देणारे ५ रंग! गौरी- गणपतीत नेसायला तुमच्याकडे 'या' रंगांच्या साड्या आहेत का?
ही रिंग वापरून तुम्ही हवे तसे सुंदर डेकोरेशन करू शकता. वेगवेगळ्या माळा, लटकन लावून तुम्हाला छान सजावट करता येईल.