Join us  

बिस्किटे आणि मिरच्यांचा गणपती! पाहा अभिनेत्री टिना दत्ताने केलेला सुंदर इकोफ्रेंडली गणेशा, व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2022 12:54 PM

Ganpati Bappa Using Biscuits And Red Chilli: थोडीशी कल्पकता वापरली की कशातूनही गणरायाचे रूप साकारता येते. अभिनेत्री टिना दत्ता (Tina Datta) हिनेदेखील मिरच्या आणि बिस्किटे वापरून अतिशय सुंदर गणराय तयार केले आहेत.

ठळक मुद्देअशा पद्धतीने गणपती बनवणं अगदी सोपं असून तुम्ही घरात तुमच्या लहान मुलांनाही तिचा हा व्हिडिओ दाखवू शकता आणि त्यांना या गणेशोत्सवात अशा पद्धतीने गणपती तयार करायला लावू शकता.

गणेशोत्सवादरम्यान (Ganpati Festival) असे कलाकार आपण अनेक बघतो. नारळ, नाणी, फळं अशा बऱ्याच गोष्टींचा वापर करून अनेक जण त्यांच्या त्यांच्या कल्पकतेनुसार सुंदर गणपती तयार करतात. कुणी कुणी तर त्यांच्या दिलेल्या कोणत्याही अक्षरावरून गणरायाचं सुंदर चित्र रेखाटू शकतात. याच सगळ्या कल्पकतेमुळेच आज आपण गणरायाची असंख्य रुपे आपल्या आजूबाजूला बघत असतो. अशीच मस्त कल्पना सुचली आहे अभिनेत्री टिना दत्ता (Tina Datta) हिला. तिने बिस्किटे, मिरच्या आणि पानांचा उपयोग करून एक सुरेख बाप्पा साकारला आहे. (Ganpati Bappa Using Biscuits And Red Chilli)

 

टिनाने काल गणेशउत्सवाच्या मुहूर्तावर हा व्हिडिओ इन्स्टाग्रामला शेअर केला आहे. अगदी झटपट तिने बनविलेला हा बाप्पा  अतिशय सुरेख असून तिचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये ती अगदी सहजतेने बाप्पा साकारताना दिसते आहे. अशा पद्धतीने गणपती बनवणं अगदी सोपं असून तुम्ही घरात तुमच्या लहान मुलांनाही तिचा हा व्हिडिओ दाखवू शकता आणि त्यांना या गणेशोत्सवात अशा पद्धतीने गणपती तयार करायला लावू शकता. तिच्या या व्हिडिओला कॅप्शन देताना ती म्हणते आहे की माझा गणपती बाप्पा नेहमीच स्पेशल असतो. यावर्षी जरा वेगळ्या पद्धतीने  गणेशोत्सव साजरा करत असल्याचं  सांगून तिने तिच्या सगळ्या चाहत्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

बिस्किटे आणि मिरच्यांचा गणपती बनविण्यासाठी तिने २ ते ३ गोलाकार बिस्किटे वापरली आहेत. सगळ्यात आधी तर एक गोल बिस्किट मध्यभागी ठेवले. दुसरे गोल बिस्किट मधोमध तोडून त्याचा उपयोग गणरायाच्या कानासाठी केला. नंतर बिस्किटाचा तुकडा मध्यभागी पोट म्हणून आणि नंतर आणखी बिस्किटांचे तुकडे त्याचे पाय म्हणून ठेवले. सोंड म्हणून मिरचीचा वापर केला तर एक- दोन पानं वापरून गणरायाला आणखी सजावट केली. बघा हा तिचा व्हायरल व्हिडिओ.  

टॅग्स :सोशल व्हायरलटिना दत्तागणेशोत्सवगणेशोत्सव