गेल्या दहा दिवसांपासून लोक गणपती बाप्पांच्या (Ganpati Festival) दर्शनात व्यस्त होते. सोशल मीडियावर बाप्पाचे भक्तीमय व्हिडिओ, मूर्तीकारांचे व्हिडिओ, डेकोरेशन तुफान व्हायरल होत होते. दरम्यान इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या एका मुलीच्या कलाकृतीनं नेटिझन्सना वेड लावलं आहे. (Special Ganpati Makeover Everything is Made from Scratch and Craft Works) या व्हिडिओत आपण पाहू शकता. कलात्मकेचा परिपूर्ण वापरत करत गणपती साकाराला आहे.
गणपतीच्या डेकोरेशनचं साहित्य गोळा करून एक तरूणी बसली आहे. ती सगळ्यात आधी गणपतीची सोंड तयार करते. त्यानंतर दागिन्यांचा अंदाज घेते. त्यानंतर मुकुट तयार करते आणि मुकुटाला स्टोन्स लावते. या मेकओव्हरची खासियत म्हणजे कोणतंही उपकरण न वापरता फक्त हातानं तयार केलेल्या वस्तूंपासून हा गेटअप तयार करण्यात आला. एखाद्या रेडीमेड मूर्तीप्रमाणे हा गेटअप दिसतो.
३ दिवस जवळपास ४, ४ तास बसून या तरूणीनं सुंदर गणपती बाप्पा साकारले. n7_makeoverartistry या इंस्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून प्रत्येकजण तिच्या क्रिएटिव्हीचे कौतुक करत आहे. तिच्या प्रयत्नांचे कौतुक करत असलेल्या कमेंट्स युजर्सनी केल्या आहेत. आतापर्यंत ३६ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडिओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.