Lokmat Sakhi >Social Viral > अरे आवरा यांना! लसूण आइस्क्रिमचा व्हिडिओ होतोय व्हायरल, हा प्रयोग पाहून लोक म्हणाले....

अरे आवरा यांना! लसूण आइस्क्रिमचा व्हिडिओ होतोय व्हायरल, हा प्रयोग पाहून लोक म्हणाले....

Garlic ice cream viral : हे विचित्र आइस्क्रीम इंटरनेटवर चर्चेचा विषय बनले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 03:52 PM2022-08-23T15:52:47+5:302022-08-23T17:49:38+5:30

Garlic ice cream viral : हे विचित्र आइस्क्रीम इंटरनेटवर चर्चेचा विषय बनले आहे.

Garlic ice cream viral on the internet would you like to test it people gave reaction | अरे आवरा यांना! लसूण आइस्क्रिमचा व्हिडिओ होतोय व्हायरल, हा प्रयोग पाहून लोक म्हणाले....

अरे आवरा यांना! लसूण आइस्क्रिमचा व्हिडिओ होतोय व्हायरल, हा प्रयोग पाहून लोक म्हणाले....

खाद्यपदार्थांच्या उत्तम  चवीसाठी लोक हजारो रुपये खर्च करायला तयार असतात. इतकेच नाही तर काही लोक असेही आहेत ज्यांना आवडते पदार्थ खाण्यासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करायला आवडते. तथापि, आजकाल असा ट्रेंड आहे की विचित्र गोष्टींचे मिश्रण करून ते खाद्य पदार्थ तयार करतात.  असेच नवीन कॉम्बिनेशन फूड तयार करण्यात आले आहे. (Garlic ice cream viral on the internet)

आईस्क्रीम लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. वेगवेगळ्या फ्लेवर्सची लोकांची स्वतःची आवड असते. काहींना स्ट्रॉबेरी आवडतात तर काहींना व्हॅनिला आवडतात, पण तुम्ही कधी लसणाच्या सालीने बनवलेले आईस्क्रीम खाल्ले आहे का? (Garlic ice cream viral on the internet would you like to test it people gave reaction)

एका व्यक्तीने असे आईस्क्रीम तयार केले आहे, ज्याबद्दल वाचून तुम्हीही थक्क व्हाल. याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक माणूस लसणाच्या पाकळ्यांचा संपूर्ण घड घेऊन कपमध्ये टाकत आहे. यानंतर तो कपमध्ये पाणी ओतताना दिसतो. काही सेकंदांनंतर तो हातात पॉप्सिकल घेऊन दिसतो.

२ लेकरांना सोबत घेऊन फुड डिलिव्हरीसाठी पायपीट करतेय माऊली; इमोशनल-अस्वस्थ करणारा व्हिडिओ

हे विचित्र आइस्क्रीम इंटरनेटवर चर्चेचा विषय बनले आहे. मेघा नावाच्या एका न्यूट्रिशनिस्टने व्हिडिओ शेअर करून यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'लोक लसणाची चटणी बनवतात, काहीजण भाजीही बनवतात. पण, लसूण आईस्क्रीम कोण बनवते?'

मेघाने व्हिडिओला इमोजीसह कॅप्शन दिले, 'लसूण आइस्क्रीम.' या धक्कादायक कल्पनेवर नेटिझन्समध्ये हशा पिकला. ही विचित्र कल्पना पाहून अनेकांच्या मनात विचार आला. काहींनी त्या माणसाचे समर्थन केले आणि लसणाच्या आरोग्य फायद्यांबद्दल सांगितले. या माणसानं लसूण आइस्क्रीमचा आस्वाद घेतला तर काय अडचण आहे. अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. 

Web Title: Garlic ice cream viral on the internet would you like to test it people gave reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.