Join us  

गॅस सिलेंडरच्या पाईपलाही असते एक्सपायरी डेट, आत्ताच घरातील पाईप चेक करा, अन्यथा घडेल दुर्घटना, वेळीच काळजी घ्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2023 12:28 PM

Gas Cylinders Pipes have Expiration Date Too. Check out the process : सिलेंडर पाईपची एक्स्पायरी डेट पाहण्याची सोपी ट्रिक, डेट पाहून करा बदल, पाईप फुटण्याआधी टळेल दुर्घटना..

घरात असे अनेक गोष्टी आहेत, ज्याचा वापर आपण दैनंदिन जीवनात करतो, पण त्याची एक्स्पायरी डेट आपल्याला ठाऊक नसते. ज्यामुळे मोठी दुर्घटना देखील घडू शकते. मोठी दुर्घटना घडण्याआधी त्यावर उपाय करणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यात सिलेंडर आणि शेगडीला जोडणाऱ्या पाईपचा (Cylinder Pipes) देखील समावेश आहे. अनेकदा तांत्रिक बिघाडामुळे सिलेंडरचा स्फोट होतो तर, अनकेदा नकळत घडणाऱ्या चुकांमुळेही अपघात होतो. त्यामुळे अपघातांना निमंत्रण देण्याआधी खबरदारी घेतलेली बरी.

जर आपल्याला सिलेंडरला जोडणाऱ्या पाईपची एक्स्पायरी डेट नक्की कुठे असते? गॅस सिलेंडर पाईपची काळजी घेण्यासाठी नक्की काय करावे? (Social viral) साधारण घरातील गृहिणीही सिलेंडर पाईपची एक्सपायरी डेट पाहू शकते का? सिलेंडर पाईप खराब झाले आहे की नाही हे चेक करण्यासाठी कोणती ट्रिक उपयोगी पडेल. पाहूयात(Gas Cylinders Pipes have Expiration Date Too. Check out the process).

२०२३ मध्ये जगभरातल्या तारुण्याला पडली ' रिज ' शब्दाची भुरळ, ' असे ' त्या शब्दात काय आहे की..

अशा पद्धतीने चेक करा सिलेंडर पाईपची एक्स्पायरी डेट

इन्स्टाग्रामवर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यात त्यांनी सिलेंडर पाईपची एक्स्पायरी डेट कशी चेक करायची, याची माहिती दिली आहे. यासाठी आधी बीआयएस केअर साईटवर जा किंवा अॅप डाऊनलोड करा. नंतर एक्स्पायरी डेटची पडताळणी करण्यासाठी त्या विभागात जा. एक्सपायरी डेट वेरिफायच्या कॉलममअध्ये क्लिक करा. नंतर सिलेंडर पाईपवर दिलेला नंबर कॉलममध्ये भरून पाईपची एक्यपायरी डेट चेक करा.

पोळपाट लाटणे तुम्ही खरेच एकदम स्वच्छ करता का? पाहा योग्य पद्धत, नाहीतर होते इन्फेक्शन

सिलेंडर पाईप लावण्याआधी २ गोष्टी करा चेक

सिलेंडर पाईप लावल्यानंतर २ गोष्टींची काळजी घ्यायला हवी. सिलेंडर पाईप दर १८ ते २४ महिन्यात बदलायला हवे. शिवाय आयएसआय मार्क असलेल्याच पाईपची खरेदी करा. जर मार्क असूनही, १८ महिन्याच्या आत काही दुर्घटना घडली तर, कंपनीकडून नुकसान भरपाई मिळेल. जर एक्स्पायरी डेटनंतर पाईपसंबंधित दुर्घटना घडली तर, याची नुकसान भरपाई कंपनी देणार नाही.

टॅग्स :किचन टिप्ससोशल व्हायरलसोशल मीडिया