गॅस पेटवण्यासाठी लायटरचा (Gas Lighter ) वापर होतो. पण सध्या बाजारात असे देखील गॅस शेगडीचे प्रकार उपलब्ध आहेत, जे बिना लायटरच्या वापराने चालू होतात. पण आजही बहुतांश घरात लायटरचा वापर होतो. पण जर घरात लायटर नसेल तर, गॅस पेटवायचा कसा? असा प्रश्न निर्माण होतो. पदार्थ बनवून झाल्यानंतर आपण गॅस नियमित साफ करतो. पण लायटरचं काय?
बराच काळ लायटर स्वच्छ न केल्यामुळे ते खूप कळकट आणि अस्वच्छ दिसतात. लायटर साफ करताना अनेकदा त्यात पाणी शिरते, ज्यामुळे लायटर खराब होण्याची शक्यता वाढते. त्याचा स्पार्क कमी होतो. त्यामुळे लायटर साफ कसा करावा असा प्रश्न गृहिणींना पडतो. जर लायटर काही मिनिटात स्वच्छ करायचं असेल तर, काही गोष्टींचा वापर करून स्वच्छ करा(Gas Lighter Cleaning Tips).
बेकिंग सोडा
लायटरवरील चिकट डाग काढण्यासाठी आपण बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. यासाठी एका बाऊलमध्ये २ चमचे बेकिंग सोडा घ्या, त्यात १ चमचा लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट लायटरवर लावा. २० मिनिटांसाठी तसेच ठेवा, २० मिनिटानंतर कोरड्या कापडाने पेस्ट काढा. पेस्टबरोबर चिकट डागही निघतील.
दुधासोबत अजिबात खाऊ नये असे ५ पदार्थ, पोटात तयार होईल विष, बिघडेल आरोग्य..
तांदुळाचं पाणी
तांदुळाच्या पाण्याने देखील आपण लायटर स्वच्छ करू शकता. यासाठी एका वाटीत २ चमचे तांदुळाचं पाणी घ्या, त्यात इनो मिक्स करून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट लायटरवर लावा. १५ मिनिटानंतर स्क्रबर किंवा कोरड्या कापडाने पेस्ट पुसून काढा. यामुळे चिकट डाग काही मिनिटात दूर होतील.
टूथपेस्ट
टूथपेस्ट फक्त दात चमकवत नसून, लायटर देखील चमकवण्यासाठी मदत करते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी लायटरवर टूथपेस्ट लावून कोट करा. सकाळी ब्रशने लायटर घासून काढा, यामुळे काळपट पडलेला लायटर चमकेल.
नियमित ३ गोष्टी खा, दात चमकतील मोत्यासारखे! पिवळ्या पडलेल्या दातांसाठी सोपा उपाय
लायटरमध्ये पाणी गेल्यावर काय करावे?
लायटर स्वच्छ करताना त्यात अनेकदा पाणी शिरते. ज्यामुळे लायटरमधून स्पार्किंग होत नाही. अनेक प्रयत्न करूनही गॅसची शेगडी पेटत नाही. अशा स्थितीत लायटर नेहमी कोरड्या कपड्याने स्वच्छ करा आणि काही वेळ उन्हात ठेवा. यामुळे लायटर व्यवस्थित काम करेल.